मुंबई, 20 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरे
(MNS Chief Raj Thackeray) यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा आपल्या प्रकृतीमुळे तूर्तास स्थगित
(Raj Thackeray Ayodhya Tour postponed) केला होता. आता त्यांच्या प्रकृती संदर्भात
(Raj Thackeray Health) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज सकाळी लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली आहे. मनसे अधिकृत या मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या पायाला झालेल्या दुखापतीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळेच ते मागच्या महिन्यात पुणे दौरा अर्धवट दौरा सोडून मुंबईत आले होते. डॉक्टरांकडून राज ठाकरे यांना हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी लीलावती रुग्णालयात ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.
हेही वाचा - एकीकडे मतदान सुरू असताना भाजपचा मोठा नेता पोहोचला अजितदादांच्या भेटीला, विधानभवनात खळबळ
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या झालेल्या सभा आणि त्यासभेत त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर मांडलेली भूमिका यामुळे वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळालं. त्यात राज ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी मनसेकडून रेल्वे बुक करण्यात आल्या होत्या. मात्र, नंतर राज ठाकरे यांनी आपल्या प्रकृतीमुळे अयोध्या दौरा रद्द केला होता. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता.
कार्यकर्त्यांना केले होते आवाहन -
नुकताच राज ठाकरे यांचा 54वा वाढदिवस झाला यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आपली शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कुणीही भेटायला येऊ नये, तसेच जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्या, असे आवाहन केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.