Home /News /mumbai /

सुरेश रैनासोबत आणखी एका गायकावर कारवाई, ह्रतिकची पत्नी सुद्धा होती पार्टीत!

सुरेश रैनासोबत आणखी एका गायकावर कारवाई, ह्रतिकची पत्नी सुद्धा होती पार्टीत!

मुंबईतील ड्रॅगन पॅलेस पबवर पोलिसांनी भल्या पहाटे 2.30 वाजता छापा टाकला होता. या पबमध्ये सुरेश रैनासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजर होते.

    मुंबई, 22 डिसेंबर : नुकताच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारताच्या मधल्या फळीतला खास फलंदाज सुरेश रैना (suresh raina) आता वेगळ्याच प्रकरणामुळे अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी एका पबवर छापा टाकला आहे, या कारवाईत रैनावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुरेश रैनासोबत ह्रतिक रोशनची पत्नी सुझान खानवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारने आधीच कोरोनाच्या परिस्थितीमुळे बार, पब आणि क्लबला कडक नियम घालून दिले आहे.  पण, नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.   मुंबईतील ड्रॅगन पॅलेस पबवर पोलिसांनी भल्या पहाटे 2.30 वाजता छापा टाकला होता. या पबमध्ये सुरेश रैनासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजर होते. या पबला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ हा पब सुरू होती तसंच पबमध्ये परवानगीपेक्षा जास्त गर्दी करण्यात आली होती. एवढंच नाहीतर कुणीही मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत नव्हते. पोलिसांनी छापा टाकून एकूण 35 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सुरेश रैना, गायक गुरू रंधावा आणि सुपरस्टार ह्रतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश रैना याच्याविरोधात कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यासह सुझान खान, गुरू रंधावा यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. सकाळी सर्व सेलिब्रिटींना जामीन सुद्धा देण्यात आला. लोकांची भीती घालवण्यासाठी Joe Biden यांचा पुढाकार, LIVE TV वर घेतली कोरोना लस सुरैश रैनाने याच वर्षी 15 ऑगस्ट रोजी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. महेंद्रसिंग धोनीने एकदिवशी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत रैनाने 'आपण तुझ्यासोबत आहोत' असं सांगत निवृत्तीची घोषणा केली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या