S M L

हे 'प्रभू', एसी लोकल कधी धावणार ?

उशिरा का होईना पण रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मान्य केलं की, एसी लोकल सदोष बनवली गेलीय.

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2017 06:47 PM IST

हे 'प्रभू', एसी लोकल कधी धावणार ?

स्वाती लोखंडे, मुंबई

19 एप्रिल : उशिरा का होईना पण रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मान्य केलं की, एसी लोकल सदोष बनवली गेलीय. मुंबईत एसी लोकल दाखल होऊन वर्ष उलटलं तरीही अजून यातले दोष दूर करण्यात रेल्वे गुंतलीय.

2016 ची डेडलाईन पाळण्याच्या घाईत चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून एसी लोकल बाहेर काढली गेली खरी. पण अजूनही ती मुंबईकरांना उपयोगी ठरली नाही. याचं कारण म्हणजे तिची निर्मिती...मुळात ती सदोष बनवली गेलीये. तिच्यात असणाऱ्या अनेक चुकांमुळे तिचे दोष सुधारण्यात वेळ जातोय. रेल्वे मंत्र्यांनी हार्बरवासीयांना एसी लोकलचं गाजर दाखवलं खरं..पण ती ना हार्बरवर धावू शकतेय ना सेंट्रलवर..

एसी लोकलध्ये काय दोष आहेत ?

१ तिची उंची प्रमाणापेक्षा जास्त आहे

Loading...

२ एसी चे डक फार उंच असल्याने कुर्ला ते सीएसटी या टप्प्यात ती धावू शकत नाही

३ सॉफ्टवेअर मधल्या दोषाने त्यातील एसी आणि lights नियंत्रित करण्यात अडथळा

हे सगळे दोष दूर करण्याचं काम सुरू आहे हे रेल्वे मंत्र्यांनी आता कबूल केलं असलं तरी आयबीएन लोकमतनं हे आधीच दाखवलं होतं.

ही लोकल आधी पश्चिम रेल्वेवर धावणार होती. पण रेल्वेमंत्र्यांनी कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता ती देऊ केली सीएसटी ते पनवेल या हार्बर मार्गाला...आणि आता परत ती पश्चिम रेल्वेकडेच जाईल. असं नाही की एसी लोकलच्या उंचीमुळे पश्चिम रेल्वेवर फरक पडणार नाही. पण त्यासाठी करावे लागणारे बदल हे मध्य रेल्वेपेक्षा अत्यंत कमी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 06:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close