Home /News /mumbai /

देशात गोळीबार करण्याची फॅशन झालीये - सुप्रिया सुळे

देशात गोळीबार करण्याची फॅशन झालीये - सुप्रिया सुळे

हा तो भारत देश नाही. ज्या भारतात माझा जन्म झाला' असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य केलं.

    मुंबई, 02 फेब्रुवारी : 'हा तो भारत देश नाही. ज्या भारतात माझा जन्म झाला' असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य केलं. तसंच, देशात गोळीबार करणे ही फॅशन झाल्याची टीकाही सुळे यांनी केली. त्या मुंबईत बोलत होत्या. मुंबईच्या वाय.बी.चव्हाण सभागृहात आज मुंबई कलेक्टीव्ह चा समारोप पार पडला. 'मीस यू संविधान' या चर्चासत्राने मुंबई कलेक्टीवची सांगता झाली. या चर्चा सत्रात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि कम्युनिस्ट नेते सिताराम येचुरी  प्रमुख पाहुणे होते. 'हा तो भारत देश नाही ज्या भारतात माझा जन्म झाला' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी  टीका केली. यासोबतच, देशात गोळीबार करणे ही फॅशन झाल्याचेही, त्या म्हणाल्या. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे धर्मग्रंथ असतात. मात्र, माझ्या देशाचा धर्मग्रंथ आहे तो म्हणजे संविधान आणि त्याला आम्ही वाचवू, असं सिताराम येचुरी  म्हणाले. CAA विरोधातील लढ्याचं केंद्र झालेल्या 'शाहीन बाग'मध्येही गोळीबार दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी जामिया विद्यापीठानंतर आता शाहीन बागमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. CAA आणि NRC या कायद्याला विरोधाचं केंद्र झालेल्या शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच जामीया विद्यापीठ परिसरात झालेल्या गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच शाहीन बागमध्येही असाच प्रकार झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जामीया विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या CAA विरोधात निदर्शनं सुरू असताना एका युवकानं गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला होता. जामीयामध्ये गोळीबार करणाऱ्या त्या माथेफिरू तरुणाचा सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली. या विद्यापीठाच्या परिसरात निदर्शने सुरु असताना हा तरुणमध्ये घुसला होता. त्यानंतर त्याने आपल्या जवळच्या पिस्तुलाने गोळी झाडत काही घोषणाही दिल्या होत्या. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हा तरुण हवेत पिस्तुल दाखवत घोषणाबाजी करत असतानाही पोलिसांनी त्याला रोखलं नाही असा अशी टीका होत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या