शरद पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंना मिळालं खास गिफ्ट!

शरद पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंना मिळालं खास गिफ्ट!

सुप्रिया सुळे यांना थेट मोठी जबाबदारी दिल्यानं भविष्यात पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडतील अशी चर्चा आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुलगी सुप्रिया सुळे यांना मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभेत राष्ट्रवादीच्या संसदीय नेतेपदी सुप्रिया सुळे यांनी निवड करण्यात आली आहे. याआधी हे पद तारीक अन्वर यांच्याकडे होते.

लोकसभेत उपनेतेपदी धनंजय महाडिक यांची निवड केली आहे. बिहार येथून असलेले खासदार तारीक अन्वर यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचं संसदीय नेते पद रिक्त होतं. त्या जागी आज सुप्रिया सुळेंना संधी देण्यात आली.

धनंजय महाडिक यांची उपनेतेपदी निवड झाल्यामुळे कोल्हापुरातल्या स्थानिक गटबाजीलाही संदेश देण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते यांना डावलून कमी अनुभवी असलेले महाडिक यांना संधी दिल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय.

महाडिक यांची निवड झाल्यामुळे आगामी निवडणुकीत कुणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मोहिते यांना डावल्यामुळे त्यांना पुन्हा माढा येथून उमेदवारी मिळणार की नाही अशी चर्चा रंगू लागली आहे.

माढा इथं मोहिते खासदार असून आता इथं प्रभाकर देशमुख इच्छुक असून मोहिते की देशमुख अशी चर्चा असतानाच वरिष्ठ मोहिते यांना डावलत महाडीक संधी मिळाली.

विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांना थेट मोठी जबाबदारी दिल्यानं भविष्यात पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडतील अशी चर्चा आहे.

=====================================

First published: December 12, 2018, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading