दादर रेल्वे स्टेशनवर सुप्रियाताईंना आला विचित्र अनुभव, पोलिसांकडे केली तक्रार

दादर रेल्वे स्टेशनवर सुप्रियाताईंना आला विचित्र अनुभव, पोलिसांकडे केली तक्रार

ट्रेन जेव्हा दादरला थांबली तेव्हा एक इसम ट्रेनमध्ये शिरला. त्यावर सुप्रियाताईंनी त्याला हटकलं. तो ट्रेनमधून उतरला पण सुप्रियाताईंच्या मागे त्याने सारखा तगादा लावला. टॅक्सी पाहिजे का? टॅक्सी पाहिजे का? असं तो सारखं त्यांना विचारत होता....

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मुंबईतल्या दादर स्टेशनवर एक विचित्र अनुभव आला. सुप्रिया सुळे औरंगाबादहून देवगिरी एक्सप्रेसने प्रवास करून रात्री दादरला आल्या. त्यांच्याकडे 2 मोठ्या बॅग होत्या. हे सगळं सामान घेऊन ट्रेनमधून उतरायला त्यांच्याकडे अगदी कमी वेळ होता. ट्रेन जेव्हा दादरला थांबली तेव्हा एक इसम ट्रेनमध्ये शिरला. त्यावर त्यांनी त्याला हटकलं. तो ट्रेनमधून उतरला पण सुप्रियाताईंच्या मागे त्याने सारखा तगादा लावला. टॅक्सी पाहिजे का? टॅक्सी पाहिजे का? असं तो सारखं त्यांना विचारत होता. तेवढ्यात हमाल आला आणि सुप्रियाताईंनी त्याच्याकडे सामान सोपवलं. तरीही पुन्हापुन्हा तो त्यांना टॅक्सी पाहिजे का? असं विचारून भंडावून सोडत होता.

त्याची ही छळवणूक सगळ्यांच्या समोर आणावी म्हणून सुप्रिया सुळेंनी त्याचा फोटो काढला तर तो फोटोसाठीही निगरगटट्पणे उभा राहिला, असं सुप्रियाताईंनी सांगितलं. कुलजितसिंग मल्होत्रा असं या इसमाचं नाव आहे.

रेल्वे स्टेशनवर एक टॅक्सीचालक आतमध्ये शिरून महिला प्रवाशांना भंडावून सोडत असेल तर हे गंभीर आहे. म्हणूनच मी ट्विटरच्या माध्यमातून सगळ्यांसमोर हे मांडलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस आता या इसमाचा शोध घेत आहेत.पोलिसांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतल्यामुळे सुप्रिया सुळेंनी पोलिसांचे आभार मानले.

==========================================================================================

VIDEO : दादर स्थानकावर काय घडलं? सुप्रिया सुळेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

Published by: Arti Kulkarni
First published: September 12, 2019, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading