'अयोध्या' निकाल आज; सोशल मीडियावर करू नका 'ही' चूक, तुमच्यावर आहे वॉच!

सोशल माध्यमावर तुम्ही काय लिहिता आणि काय पोस्ट करता यावरही पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे. 

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 09:12 AM IST

'अयोध्या' निकाल आज; सोशल मीडियावर करू नका 'ही' चूक, तुमच्यावर आहे वॉच!

मुंबई,9 नोव्हेंबर: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर आज, शनिवारी सुप्रीम कोर्ट आपला ऐतिहासिक निकाल देणार आहे. सकाळी 10:30 वाजता निकालपत्र वाचण्यास सुरुवात होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे या प्रकरणावर आपला निर्णय देणार आहेत. सरन्यायाधीश गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होत असून त्याआधी या प्रकरणाचा निकाल देणार आहेत.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. संवेदनशील भागांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नुसता पोलिसांचा पहारा लोकांवर नाही तर त्यांच्या मोबाइलवरही असेल. सोशल माध्यमावर तुम्ही काय लिहिता आणि काय पोस्ट करता यावरही पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे. 

कसा असेल मुंबई पोलिसांचा पहारा..

- सुमारे 50 हजार पोलीस तैनात

-मुंबई पोलीस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, सायबर शाखा पोलीस विशेष दक्ष

Loading...

- संवेदनशील भागांत विशेष पहारा

-रेल्वे स्टेशन वर रेल्वे पोलीस तैनात

- बांद्रा, मालाड, मशीद बंदर, पायधुनी सारखे संवेदनशील भाग

सोशल मीडियावर करू नका 'ही' चूक..

- निकालानंतर सेलिब्रेशन किंवा जाहीररीत्या दुःख प्रकट करता येणार नाही.

- सोशल मीडियावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करता येणार नाही.

- कोणत्याही प्रकारची प्रार्थना होऊ दिली जाणार नाही

सलग 40 दिवस या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर 16 ऑक्टोबरला सरन्यायाधीशांनी या प्रकरणावरचा निकाल राखीव ठेवला होता. गेली अनेक दशकं देशाचं राजकारण आणि समाजकारण अयोध्या प्रकरणामुळे ढवळून निघालं असून आज या वादग्रस्त प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखाली पाच ज्येष्ठ न्यायाधीशांचे खंडपीठ तयार करण्यात आले होते. या खंडपीढापुढे या प्रकरणाशी संबंधीत सर्व पक्षकारांच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केला होता. पुरावे सादर केले होते. त्यानंतर सरन्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला आहे.

या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु झाल्यानंतर एक मध्यस्थ समिती नेमून त्यांनी कोर्टाबाहेर तोडगा काढावा, असे सुचवले होते. त्या समितीने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांशी चर्चा करून कोर्टाला गोपनीय अहवाल सादर केला. मध्यस्थी शक्य नसून संबंधीत पक्षांना तोडगा मान्य होत नाही, असे या मंडळाने कोर्टाला सांगितल्यानंतर कोर्टाने प्रकरणाची दररोज सुनावणी घेत अंतिम निर्णय देण्याचे जाहीर केलं होतं.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशभर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून उत्तर प्रदेशात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसच गृहमंत्रालयाने देशभरात अलर्टही जारी केलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम ठेवावा असं आवाहन सामाजिक नेते आणि सर्वच धर्मांच्या धर्मगुरूंनी केला आहे.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 08:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...