सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पर्युषण काळात मुंबईतील 3 मंदिरं उघडणार

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पर्युषण काळात मुंबईतील 3 मंदिरं उघडणार

गणेशोत्सव किंवा इतर सार्वजनिक सणांवर मात्र निर्बंध कायम, कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेणार- न्यायालय

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : जगभरात यंदा कोरोनाचं महासंकट असल्यानं त्याचा परिणाम सर्व स्तरावर पाहायला मिळत आहे. अगदी बाजारापासून ते सण-उत्सवावरही कोरोनाचं सावट असल्यानं अनेक मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक उत्सव करण्यासाठी बंधन आली आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन आणि न्यायालयानं काही निर्बंध घातले आहेत.

कोरोना काळात जैन धर्मातील बंधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवासोबत त्यांचा पर्युषण पर्वही सुरू झाला आहे. जैन बांधवांना हा सोहळा साजरा करण्यासाठी जैन मंदिरांमध्ये जाण्याची परवानगी मिळाली आहे. 22 आणि 23 ऑगस्ट दोन दिवस मुंबईतील भायखळा, दादर आणि चेंबूरमधील मंदिरं भाविकांसाठी खुली राहणार आहेत.

पर्युषण पर्वाचे शेवटचे दोन दिवस ही मंदिरं उघडण्यात यावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे. मंदिरांमध्ये कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

हे वाचा-मोठी बातमी! मुंबईत क्वारंटाईनचे नियम बदलले; पालिकेने परिपत्रक काढून दिली माहिती

हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं केवळ जैन मंदिरांसाठी दोन दिवसांपूरताच घेतला आहे. दरम्यान गणेशोत्सव किंवा इतर सणांसाठी मंदिरांमध्ये भाविकांना उत्सव साजरा करता येणार नाही. 'कोरोनाचा धोका आणि गर्दीचा विचार करता 2 दिवस मंदिरं खुली ठेवण्याची सवलत गणेशोत्सवाला देता येणार नाही कारण भाविकांवर नियंत्रण ठेवणं आणि कोरोनाचा संसर्ग टाळणं अशा मोठ्या उत्सवांमध्ये कठीण होऊ शकतं असंही सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी सांगण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 21, 2020, 2:33 PM IST

ताज्या बातम्या