दहीहंडीबाबतची याचिका पुन्हा हाय कोर्टाकडे

दहीहंडीबाबतची याचिका पुन्हा हाय कोर्टाकडे

तसंच 7 ऑगस्टला याचिकेवर सुनावणी करण्याचे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला निर्देश दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 01 आॅगस्ट, प्रतिनिधी : दहीहंडीच्या उंचीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत दहीहंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पुन्हा मुंबई हायकोर्टाकडे पाठवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. तसंच 7 ऑगस्टला याचिकेवर सुनावणी करण्याचे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला निर्देश दिले आहेत.

वीस फूट उंचीसह गोविंदाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने गोविंदा हिरमुसला आहे. सण आणि संस्कृती जपण्याच्या सबबीखाली आयोजकांनी सरकारला हे नियम शिथिल करण्यासाठी साकडे घातले. मात्र सध्यातरी सरकारच्या हाती काहीच नसल्याने सरकारनेही नियमांत बदल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 12:47 PM IST

ताज्या बातम्या