मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'उद्धव ठाकरेंना साथ द्या..' राज ठाकरे यांच्याकडे कोणी केली मागणी? पाडवा मेळाव्यात होईल घोषणा?

'उद्धव ठाकरेंना साथ द्या..' राज ठाकरे यांच्याकडे कोणी केली मागणी? पाडवा मेळाव्यात होईल घोषणा?

राज ठाकरे यांच्याकडे कोणी केली मागणी?

राज ठाकरे यांच्याकडे कोणी केली मागणी?

राज ठाकरे आज मनसेची भविष्यातील दिशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

प्रमोद पाटील, प्रतिनिधी

मुंबई, 22 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा आज गुढीपाडवा मेळावा होत असून राज ठाकरे आज शिवाजी पार्कवरील सभेला संबोधित करणार आहेत. राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रातील अनेकांची इच्छा आहे. यापूर्वी बऱ्याचवेळा दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली होती. अशीच इच्छा पुन्हा एकदा मनसैनिक बोलून दाखवत आहे.

उद्धव ठाकरेंना साथ द्या, मनसैनिकांची इच्छा

गुढीपाडव्याच्या दादर मधील शिवतीर्थ या ठिकाणी मनसेचा मेळावा होत आहे. राज्यातील अनेक मनसैनिक मोठ्या संख्येने राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी निघाले असून नवी मुंबईतील मनसैनिक मोठ्या संख्येने निघाले आहेत. त्यांच्या मते राज ठाकरे यांनी कोणताही आदेश आम्हाला आज द्यावा आम्ही त्याचे पालन करू तर त्यांनी राज ठाकरे यांचे बंधू उद्धव ठाकरे संकटात आहेत, त्यांनी जर राज ठाकरे यांना टाळी दिली तर राज ठाकरे यांनीही त्यांना साथ द्यावी. आम्हाला काहीही हरकत नाही तर संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे आम्हालाही आवडेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी महागाईवर बोलावे.. महिला मनसैनिकांची इच्छा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची परंपरेप्रमाणे आज दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथे सभा होत असून या सभेसाठी राज्यातील अनेक मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. यात महिलांचा समावेश आहे. नवी मुंबईतील महिला वर्ग देखील यावेळी राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सहभागी होत आहे. त्यांनी यावेळी भाषणात महागाईचा मुद्दा उपस्थित करावा. कारण, महागाई खूप वाढली असल्याचे यावेळी अनेक महिलांनी सांगितले. त्यामुळे त्यांना महागाईचा मुद्दा ऐकायला आवडेल असे त्या म्हणाल्या.

राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर सभा होत असून संध्याकाळी 7.30 वाजता ते सभेला संबोधित करणार आहेत. आज सकाळी राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली. तेव्हापासून राज्यभरातून कार्यकर्ते शिवाजी पार्कवर दाखल होताना दिसत आहे. विशेषत: मुंबईतील शाखांतून आणि ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पालघर आणि पुण्यातील हजारो कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत.

First published:
top videos

    Tags: Raj Thackeray, Uddhav Thackeray