फक्त गुजरातलाच Remdesivir पुरवठा करा, मलिक यांचा आणखी मोदी सरकारवर 'लेटरबॉम्ब'

फक्त गुजरातलाच Remdesivir पुरवठा करा, मलिक यांचा आणखी मोदी सरकारवर 'लेटरबॉम्ब'

रेमडेसीवीर इंजेक्शनच्या ( Remdesivir) पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बिकट असताना  ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनच्या (Oxygen and Remdesivir Shortage in Maharashtra) पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी आणखी एक पुराव्यानिशी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला असून 'रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा फक्त गुजरातला द्यावा' असं पत्रच ट्वीट केले आहे.

नवाब मलिक यांनी एकापाठोपाठ पत्र ट्वीट करून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मलिक यांनी एक पत्रक ट्वीट केले आहे. यात गुजरातमधील भरूच इथं औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे पत्रक समोर आणले आहे. या पत्रात bdr pharmaceuticals international pvt ltd या कंपनीला रेमेडीसीवीर इंजेक्शनचा साठा फक्त गुजरातमध्येच विक्री करण्यास परवानगी दिली आहे.

याआधी मलिक यांनी आणखी एक पत्रक समोर आणले होते. महाराष्ट्र सरकारला एक्सपोर्ट कंपन्या थेट रेमेडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार होते, पण त्यांना केंद्रानं रोखल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

'उद्धव ठाकरे राजकारण थांबवा, माझे राज्य माझी जबाबदारी ओळखा'-पीयूष गोयल

रेमडेसीवीर इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता केंद्र सरकारनं रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळं 16 निर्यातदार कंपन्यांकडे जवळपास 20 लाख रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होते. हे इंजेक्शन मिळण्यासाठी राज्य सरकारनं या कंपन्यांशी संपर्क केला होता. केंद्र सरकारनं या कंपन्यांना महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन देण्यास नकार दिल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

अमरावतीकरांनी करून दाखवलं, लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्या मंदावली

एवढंच नाहीतर, ज्या कंपन्यांनी महाराष्ट्राला याचा पुरवठा केला तर त्यांच्यावर परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्र सरकारनं दिला असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता.

Published by: sachin Salve
First published: April 17, 2021, 5:40 PM IST

ताज्या बातम्या