Home /News /mumbai /

'माझी मान कापली तरीही...';गुवाहाटीला जाण्याच्या चर्चेवर राऊत स्टाईल उत्तर

'माझी मान कापली तरीही...';गुवाहाटीला जाण्याच्या चर्चेवर राऊत स्टाईल उत्तर

सुनील राऊत गुवाहाटीला जाणार या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

    मुंबई, 26 जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विश्वासातील अनेक दिग्गज नेते एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झाले आहेत. या बंडाचं ज्यांनी नेतृत्व केले ते एकनाथ शिंदे हे ठाकरेंचे खूप जवळचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे त्यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू होती. याला आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनील राऊत यांनी स्वत: आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे, माझी मान कापली तरी ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याची ठाम भूमिका सुनील राऊत यांनी स्पष्ट केली आहे. ते जेव्हा मुंबईत येतील तेव्हा फटाके तर वाजतीलच, असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीला पोहोचले आहेत.  उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. उदय सामंत हेदेखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. सुरतहून विशेष विमानाने उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात करून आता राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. गुवाहाटीमधील आमदार येत्या 48 तासात मुंबईमध्ये परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज रात्री किंवा उद्या रात्री सर्व आमदार मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे समर्थकांना मुंबई विमानतळावर जमण्याच्या सुचना देण्यात आली आहे. मुंबई विमानतळाला देखील अलर्ट दिला गेला आहे. राज्यपाल आपला विशेषाधिकार वापरुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, शिंदे गटाच्या वकिलांची एक टीम हायकोर्ट आणि एक टीम सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची तयारी करत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sanjay raut, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या