मुंबई, 08 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सुनील पाटील याने मुंबई पोलिसांकडे जाऊन आपली बाजू मांडली. पोलिसांनी सुनील पाटील याचा जाब नोंदवला आहे. तसंच, माझी खोटी बदनामी करणाऱ्या भाजपचे नेते मोहित कंबोज यांची चौकशी करा, अशी मागणीच पाटील यांनी केली आहे. तसेच सुनील पाटील यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळे खुलासे केले आहेत. तसेच आर्यन खानची सुटका करण्यासाठी डील झाल्याचंही त्यांनी कबुल केलं आहे.
तत्पूर्वी भाजप नेते मोहित कंबोज (BJP Mohit kamboj) यांनी सुनील पाटील (Sunil Patil) याचा उल्लेख केला होता आणि गंभीर आरोप केले होते. मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सुनील पाटील नावाचा व्यक्ती मास्टरमाइंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. त्यानंतर काल संध्याकाळी तथाकथित मास्टरमाइंड सुनील पाटील उर्फ सुनील भटू चौधरी आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याने मुंबई पोलिसांकडे जाऊन आपली बाजू मांडली. पोलिसांनी सुनील पाटील याचा जाब नोंदवला आहे.
सुनील पाटील यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. तसेच आर्यन खानची सुटका करण्यासाठी शाहरूख खानच्या पीएसोबत डील झाल्याचं देखील त्याने कबुल केलं आहे. तसेच मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आपला कुठपर्यंत सहभाग आहे, याचं स्पष्टीकरण देखील दिलं आहे. सॅम्युअल डिसुझा, किरण गोस्वामी, मनीष भानूशाली आणि मयुर भुले या चार जणांनी हे डील करत 50 लाख रुपये टोकन म्हणून घेतल्याचा दावा सुनील पाटील याने आपल्या मुलाखतीत केला आहे.
#WATCH | Mumbai: Sunil Patil, whose name is the latest to crop up in the drugs-on-cruise case involving actor Shah Rukh Khan's son Aryan, responds to allegations levelled against him. He alleges payoff in the case pic.twitter.com/dk0YFjYtjh
— ANI (@ANI) November 8, 2021
पण आर्यन खानची सुटका न झाल्याने 50 लाख रुपयांची रक्कम शाहरुख खानची पीए पुजाला परत देण्यात आल्याचं देखील सुनील याने म्हटलं आहे. तसेच संबंधित घडामोडी घडत असताना, सुनील पाटील एका वैयक्तिक कामासाठी अहमदाबादला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवाय साहिल प्रभाकरचं स्टेटमेंट आल्यानंतर संबंधित चौघांनी मला अहमदाबादहून बाहेर जाण्यास मनाई केली. तसेच पाच दिवसांनंतर धवल आणि भानूशाली यांनी सुनीलला दिल्लीला बोलावून 'आमची साथ दे, तुला काहीही होऊन देणार नाही,' असा विश्वास दिला. पण सुनील याने साथ देण्यास नकार दिल्याने दोघांनी सुनील पाटील यास मारहाण केल्याचंही मुलाखतीत म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai