सरकारचा सुनील गावस्कर यांना दणका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट निष्फळ?

सरकारचा सुनील गावस्कर यांना दणका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट निष्फळ?

सुनील गावस्कर यांना 31 वर्षांपूर्वी भाडेपट्ट्यावर देण्यात आलेली जमीन म्हाडाच्या वतीनं जप्त करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (Maharashtra Housing and Area Development Authority) वांद्रे येथील 21 हजार 348 स्क्वेअर फुटांचा भूखंड जप्त करण्याची तयारी तयारी दर्शविली आहे.

सुनील गावस्कर यांना क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी 31 वर्षांपूर्वी (1988मध्ये) सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला हा भूखंड देण्यात आला होता. मात्र आता म्हाडाच्या वतीनं गावस्कर यांना दिलेला भुखंड जप्त करण्यात आल्याचे सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद महास्कर यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हा भुखंड परत घेण्यासाठी सरकारकडे संपर्क साधला आहे.

वाचा-अशोक चव्हाणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, पाहा VIDEO

31 वर्षांपूर्वी जमीन देण्यात आली होती

मिलिंद यांनी एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, '31 वर्षांपूर्वी क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी जमीन देण्यात आली होती. परंतु अकादमीचे बांधकाम अद्याप झाले नाही. त्यामुळं हा भुखंड जप्त करण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. अधिकृत नोंदीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने सुनील गावस्कर क्रिकेट फाऊंडेशन ट्रस्टला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहजवळ क्रिकेट अकादमी तयार करण्यासाठी जमीन भाड्याने दिली होती. 1999, 2000 आणि 2007 या वर्षात वाटपासंदर्भात अटी व शर्ती सुधारित केल्या गेल्या, परंतु फाउंडेशनने अद्याप कोणतेही बांधकाम केलेले नाही’, असे सांगितले.

वाचा-टीम ठाकरे: महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, हे आमदार झाले 'मंत्री'

सुनील गावस्कर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

मुख्य म्हणजे 24 डिसेंबर रोजी सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथील निवासस्थानी घरी भेट घेतली होती. दरम्यान या बैठकीत गावस्कर यांच्या भुखंडाबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना 27 डिसेंबर रोजी या बैठकीचा हवाला देऊन एक पत्र लिहिले होते, ज्यात ते म्हणाले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाची कारवाई कायदेशीर असल्याचे सांगितले होते.

वाचा-अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, पाहा VIDEO

आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते पत्र

शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, लिहिले की, 'जमीन वाटपाबाबत आणि सुनील गावस्कर यांची नुकतीच तुमच्याशी झालेल्या बैठकीसंदर्भात हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे. जागा वाटप झाल्यापासून सुनील गावस्कर यांनी अनेक वेळा नियम व अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे, जी वेळोवेळी मंजूर करण्यात आली आहे, परंतु अद्याप भाडेपट्टी करार झाला नाही किंवा अतिक्रमण झाले नाही. ते रोखण्यासाठी काही प्रकारचे सुरक्षा उपाय भूमीवर घेण्यात आले आहेत. क्रिकेट विश्वात सुनील गावस्कर यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे, परंतु तीन दशकांतील जमीन वाटपानंतर बांधकामांच्या कामात विलक्षण विलंब झाल्यावर, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने मला खात्री करुन दिली की या भूमीवर क्रिकेट अकादमी तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. म्हाडाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो’, असे लिहिले होते. दरम्यान सरकारकडून या कारवाईसाठी परवानगी मिळालेली नाही.

वाचा-...म्हणून संजय राऊत यांनी मारली ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्याला दांडी!

60 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर जमीन देण्यात आली

सुनील गावस्कर यांना क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी सरकारच्या वतीनं 60 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर ही जमीन देण्यात आली होती. तसेच, क्रिकेट फाऊंडेशन ट्रस्टकडे जमीन वाटप झाल्याच्या तीन महिन्यांत काम सुरू करणार असून ते तीन वर्षांत पूर्ण होणार असे सांगण्यात आले होते. मात्र कित्येक वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ट्रस्ट हे करण्यात अपयशी ठरला. कराराच्या अटींनुसार, सरकारने 60 वर्षांच्या भाडेतत्त्वावर जमीन दिली होती, ज्यावर ट्रस्ट ना नफा तत्त्वावर चालवायचा होता. इनडोअर क्रिकेट अकादमीबरोबरच हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा, जलतरण तलाव, स्क्वॅश कोर्ट आणि निवासी संकुलही बांधले जाणार होते. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे 50-50 टक्के आधारावर नफा वाटल्यास केवळ ट्रस्ट जमीन व्यावसायिकपणे वापरु शकेल असा निर्णय घेण्यात आला. 2011मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टवर जमीन अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यास सुरवात केली होती.

Tags:
First Published: Dec 30, 2019 03:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading