मुंबईत उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक !

मुंबईत उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक !

मध्य रेल्वेवर अप फास्ट मार्गावरची वाहतूक कल्याण ते दिवा वाहतूक बंद राहील. तर हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे या दोन मार्गांवर अभियांत्रिकी काम करण्यात येणार आहे.

  • Share this:

05 मे : मुंबईत उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर अप फास्ट मार्गावरची वाहतूक कल्याण ते दिवा वाहतूक बंद राहील. तर हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे या दोन मार्गांवर अभियांत्रिकी काम करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान स. १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत दोन्ही स्थानकांमध्ये सर्व धिम्या लोकल या जलद मार्गावर चालवल्या जातील.

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

- कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर ब्लॉक

- स. 11.15 ते दु. 4.25 वाजेपर्यंत ब्लॉक

- लोकल स. 10.37 ते दु. 3.56 पर्यंत डाऊन जलद मार्गावरून चालणार

- मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा

स्थानकात थांबतील

पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

- चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक

- स. 10.35 ते दु. 3.35 पर्यंत ब्लॉक

- वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालणार

हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते चुनाभट्टी ते वांद्रे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक

- डाऊन मार्गावर स. 11.40 ते दु. 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक

- अप मार्गावर 11.10 ते 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक

- वाशी/बेलापूर/वाशी ते सीएसएमटीपर्यंत स. 9.53 ते दु. 3.20 वाजेपर्यंतलोकल सेवा खंडित

- वांद्रे/अंधेरी/गोरेगाव ते सीएसएमटीपर्यंतच्या लोकल सेवा स. 10.45 ते दु. 4.58 वाजेपर्यंत खंडित

 

First published: May 5, 2018, 11:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading