Home /News /mumbai /

Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

अचानक हवामानाची लहर बदलली आणि महाराष्ट्रातल्या या हिल स्टेशनला चक्क ढगांनी वेढलं, गारवा वाढला आणि स्वेटर- कानटोप्या बाहेर काढण्याइतकी थंडी पडली. (Weather Update)

  सातारा, 13 मे :  राज्यात कालपासून हवामान खात्याच्या अंदाजानूसार (weather update) काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेच्या झळा बसताना दिसत आहेत. असानी चक्रीवादळाची (asani cyclone) तिव्रता कमी झाली असली तरी राज्यात काही जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील (mahabaleshwar) पर्वत रांगा धुक्याने झाकल्याचे दिसून आले. दिवसभर वातावरण दमट असल्याने उकाडा आणि रात्री मात्र उबदार कपडे घालून बसण्याची वेळ महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांची झाली आहे. मागच्या दोन दिवसांपुर्वी सातारा (satara) जिल्ह्यात उष्णतेची लाट होती परंतु काल आणि आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

  राज्यभरात आजही तापमान कमी होताना पहायला मिळत नाही. मात्र मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरातील (mahabaleshwar) निसर्गातली बदलाव मात्र सर्वांनाच अचंबित करणारा आहे. आज सकाळी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये धुके आणि ढगांचे लोट पहायला मिळत आहेत. या परिसरातील दऱ्याखोऱ्यातील अनेक डोंगर या ढगांच्या खेळात लुप्त झाले होते. महाबळेश्वरातील दुपारचे तापमान जरी जास्त वाटत असले तरी सुर्यास्तानंतर महाबळेश्वर फिरायला आलेल्या पर्यटकांना मात्र स्वेटर कानटोपीचा आधार घ्यावा लागत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पावसाने काल आणि आज दुपारपर्यंत हजेरी लावली. (kolhapur, sangli, satara rain)

  हे ही वाचा : Heat wave Maharashtra : ढगाळ वातावरण वादळाबरोबर जाणार! पुण्यासह मध्य महाराष्ट्रात 2 दिवसात बदलणार हवामान; विदर्भाला alert

  दरम्यान आज 13 आणि 14 मे दरम्यान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (heatwave conditions may develop over Delhi, Punjab, and Haryana) याचबरोबर 16 मेच्या आसपास आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. याचा फटका उत्तरेकडील काही राज्याना बसणार असल्याचे जेनामनी म्हणाले. प्रामुख्याने राजधानी दिल्लीत पावसाचा जोर असेल असे IMD शास्त्रज्ञ आर.के. जेनामनी म्हणाले.

  सध्या पश्चिम राजस्थान आणि विदर्भात सुमारे 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली जात आहे. दरम्यान  हे तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३ ते ४ दिवस ही उष्णतेच्या झळा आणखी तिव्र राहणार आहे. याचबरोबर पश्चिम मध्य प्रदेशातही पुढील 3 दिवस उष्णतेची लाट असू शकते असे वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आर.के. जेनामनी म्हणाले.

  हे ही वाचा : Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात, दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक, पाच जणांचा जागीच मृत्यू

  पश्चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असनी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाने आता आपला मार्ग बदलला असून आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) दिशेने वाटचाल केली आहे. हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याच दरम्यान या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Todays weather, Weather, Weather forecast, Weather update

  पुढील बातम्या