सह्याद्री अतिथीगृहात सुकाणू समितीविरोधात घोषणाबाजी, जीआरही फाडला

सह्याद्री अतिथीगृहात सुकाणू समितीविरोधात घोषणाबाजी, जीआरही फाडला

शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सह्याद्री अतिथीगृहात जोरदार घोषणाबाजी केलीये. इतकंच नाही तर या नेत्यांनी कर्जमाफीचा जीआरही फाडला.

  • Share this:

19 जून : सुकाणू समितीविरोधात शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सह्याद्री अतिथीगृहात जोरदार घोषणाबाजी केलीये. इतकंच नाही तर या नेत्यांनी कर्जमाफीचा जीआरही फाडला.

सुकाणू समिती आणि सरकार यांच्यामध्ये कर्जमाफीसाठीचे निकष ठरविण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक होती. यावेळी सरकार ठाम भूमिका घेत नाही असा शेतकरी नेत्यांनी आरोप केला. यावेळी संतप्त नेत्यांनी सरकारचा जीआरच फाडला.

त्यात सरकारच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, दिवाकर रावते सहभागी झाले होते. तर सुकाणू समितीच्या वतीनं जयंत पाटील, राजू शेट्टी, बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील, रविकांत तुपकर, अजित नवले, संजय पाटील हे सहभागी झाले होते.

First published: June 19, 2017, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading