बळीराजा जिंकला, सरसकट कर्जमाफी द्यायला राज्यसरकार तत्त्वत: तयार

बळीराजा जिंकला, सरसकट कर्जमाफी द्यायला राज्यसरकार तत्त्वत: तयार

राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजच कर्जमाफी देण्याचं जाहीर करण्यात आलंय.

  • Share this:

11 जून : राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय झालाय. राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजच कर्जमाफी देण्याचं जाहीर करण्यात आलंय. राज्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं तत्त्वतः मान्य करण्यात आलंय. शेतकऱ्यांची सुकाणू समिती आणि सरकारच्या मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

ज्या आंदोलकांकडे लुटीचा माल सापडलाय ते आंदोलक वगळून सर्वच आंदोलकांवरील गुन्हे मागं घेण्यात येणार आहेत. शिवाय 20 जूनला दुधाचे दर ठरवण्यात येणार आहेत.

शिवसेना या आंदोलनात शेतकाऱ्यांबरोबर होती, आम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडली, असं दिवाकर रावते म्हणाले.

सुकाणू समितीचे बच्चू कडू, खासदार राजू शेट्टी , रघुनाथदादा पाटील, आमदार जयंत पाटील, ज्योत्स्ना पाटील, प्रतिभा शिंदे यांची मंत्रीगटाबरोबर बैठक सुरू होती.

या निर्णयामुळे उद्याचं धरणं आणि रेलरोको आंदोलन मागे घेण्यात आलंय. मात्र आमच्या मागण्या 25 जुलैपर्यंत मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करणार, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2017 04:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading