सुजय विखे मातोश्रीवर जाऊन घेणार उद्धव ठाकरेंची भेट

सुजय विखे मातोश्रीवर जाऊन घेणार उद्धव ठाकरेंची भेट

भाजप प्रवेश केल्यानंतर सुजय विखे-पाटील हे आज (बुधवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 मार्च : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रवेश केल्यानंतर सुजय विखे-पाटील हे आज (बुधवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सुजय विखे पाटील यांची नगरमधून लोकसभा उमेदवारीसाठी केंद्रीय समितीकडे शिफारस करणार आहोत, अशी घोषणाही केली आहे. त्यामुळे नगरमधून लढताना सुय विखे यांना शिवसेनेचीही मदत होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सुजय विखे हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या समर्थकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या भाजपप्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते देखील उपस्थित होते.

सुजय विखे आणि लोकसभा उमेदवारी

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी आणि वाजल्यानंतरही सर्वच पक्षात आयाराम आणि गयारामांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अशातच सुजय विखे पाटील यांनी अखेर मंगळवारी (12 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय विखे पाटील हे अहमदनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. सुरुवातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, पवारांनी नंतर यू-टर्न घेतला. त्यामुळे सुजय विखे पाटलांच्या निवडणूक लढवण्याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता.यावर कोणताच निर्णय निघत नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील होते. यासंदर्भात, भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये नुकतीच बैठकही झाली होती आणि अखेर 12 मार्चला सुजय विखे पाटलांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे नैतिकतेचा प्रश्न म्हणून आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशा चर्चा सुरू होत्या. पण आता विखेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजीनामा देण्याचा माझा विचार नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 'सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडला कल्पना दिली आहे. मी काँग्रेस पक्षातच असणार आहे आणि पक्ष सांगेल तिच भूमिका घेणार,' अशी माहिती राधाकृष्ण विखेंनी दिली. मुलगा सुजयने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटलांची चांगलीच अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण काँग्रेसने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासारखी मोठी जबाबदारी दिलेली असताना त्यांचाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने मोठी चर्चा रंगत आहे. यामुळे, राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

VIDEO : मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल-प्रियांकांचा भाजपवर हल्लाबोल

First published: March 13, 2019, 7:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading