मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज, "तुमच्या विधानाला 100 टक्के पाठिंबा, आता केवळ अमित ठाकरेंना..."

सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज, "तुमच्या विधानाला 100 टक्के पाठिंबा, आता केवळ अमित ठाकरेंना..."

Sujat Ambedkar: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर सुजात आंबेडकर यांनीही एक मोठं विधान करत थेट आव्हानच दिलं आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 3 एप्रिल : मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी तुफान फटकेबाजी केली. या भाषणात राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात भाषश्य करताना राज ठाकरे म्हणाले, मशिदींवर मोठ्या आवाजात भोंगे लावले तर मी त्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हणायला लावेल. राज ठाकरे यांनी केलेल्या या विधानानंतर आता सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी त्यांना थेट आव्हानच दिलं आहे. काय म्हणाले सुजात आंबेडकर? सुजात आंबेडकर यांनी म्हटलं, काल कोणीतरी एक वक्तव्य केलं, की जर मोठे भोंगे मशिदीवर लावले तर मी पोरांना हनुमान चालिसा म्हणायला तिकडे लावेल. तुम्ही सर्वांनी हे वक्तव्य ऐकलं असेल. माझा तुमच्या वक्तव्याला 100 टक्के पाठिंबा आहे. फक्त एक गोष्ट आहे. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा. मला एकही बहुजन मुलगा तिकडे नको. वाचा : 'वाह रे पठ्ठ्या.. मुलाखत घेताना वाटलं नाही, आता पवारसाहेब जातीयवादी वाटतात?' सुजात आंबेडकर यांनी पुढे म्हटलं, मला एकही बहुजन मुलगा तिकडे नकोय, जे हनुमान चालिसा बोलायला तिकडे जाणार आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवा आणि मग हनुमान चालिसा बोलायला जा. सुजात आंबेडकर यांनी दिलेलं आव्हान आता अमित राज ठाकरे स्वीकारणार का? यावरुन विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. तसेच राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरुनही राजकीय नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काय म्हणाले होते राज ठाकरे? मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरेंनी म्हटलं होतं, 'मी धर्मांध नाही..प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. यापूर्वी मशिदींवरील भोंग्याबाबत मी बोललो होतो. पण अजूनही ते सुरू आहे. यापुढे सरकारने मशिदीतील हे भोंगे काढले नाही तर त्या मशिदींबाहेर दुप्पट आवाजाने स्पिकर लावू आणि त्यात हनुमानचालीसा वाजवू', यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. मदरशांवर धाडी टाका, बघा तुम्हाला काय काय सापडले, असंही ते यावेळी म्हणाले.
First published:

Tags: MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या