VIDEO : रेल्वे येत असल्याची पाहून 'तो' रूळावर जाऊन झोपला...

VIDEO : रेल्वे येत असल्याची पाहून 'तो' रूळावर जाऊन झोपला...

कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ७ वर येत असलेली ट्रेन पाहून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती चक्क रेल्वे रूळावर जाऊन झोपला.

  • Share this:

मुंबई, ता. 31 जुलै : कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ७ वर येत असलेली ट्रेन पाहून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती चक्क रेल्वे रूळावर जाऊन झोपला. त्याच क्षणी ड्युटीवर हजर असलेल्या आरपीएफच्या एका जवानाने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला फलाटावर खेचून त्याचे प्राण वाचवले. कुर्ला रेल्वे स्थानकावर सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

अगदी कुणाच्याही जीवाचा थरकाप उडवणारी ही घटना. स्वतःच्या जीवाची परवा न करता, आयुष्य संपवायला निघालेल्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी धाव घेणाऱ्या आरपीएफ जवानाला बघुन फलाटांवर उभे असलेले आणखी काहीजण मदतीला धाऊन गेले. आरपीएफने केलेल्या चौकशीनंतर आत्महत्या करणारी व्यक्ती नरेन्द्र दामाजी कोटेकर (५४ वय) असे आहे. ते लिटिल मलबार हिल सायन ट्राम्बे रोड लाल डोगर चेम्बूर येथील रहिवासी असून, कौटुंबीक कलहामुळे त्यानी ही टोकाची भूमीका घेतल्याचे समोर आले. आरपीएफने त्याच्या कुटुंबियांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ जवानाचे आभार मानून नरेन्द्र यांना त्यांचे कुटुंबिय घरी घेऊन गेले.

चाकणच्या हिंसेत पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण, प्रकृती धोक्याबाहेर

अलीकडे अशा प्रकारच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कौटुंबीक कलह, नौकरी-व्यवसायातील अडी-अडचणी या सर्व गोष्टींमुळे भावनेचा गु्ंता सोडवितांना अनेकांचा कस लागतो. तो सोडविण्याच्या नादात अनेकजण टोकाची भूमीका घेतात आणि स्वतःचा जीव गमावतात. धकाधकीच्या या जीवनात अडचणी आणि समस्या कुणाला बरे सुटल्या आहेत. पण, त्या शांततेने सोडविण्याएवजी त्यांपासून दूर पळण्याचाच अधिक प्रयत्न केला जातो. आणि त्यानंतर मागे उरतो तो केवळ आठवणींचा डोंगर. त्यामुळे धावपळीच्या या युगात स्वताःसाठी थोडा वेळ काढा, आपल्या कुटुंबीयांना वेळ द्या असे मानसोपचार तज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा..

VIDEO : दूषित पाणीपूरवठा केल्यामुळे उप-अभियंत्याला घातला तृतीय पंथीयाच्या हस्ते हार

चाकणच्या हिंसक आंदोलनात झालं 8 कोटी रुपयांचं नुकसान!

लव्हस्टोरीचा दुखद 'द एन्ड', सेल्फी VIDEO काढून ट्रेनखाली मारली उडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2018 04:31 PM IST

ताज्या बातम्या