डॉ सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू

डॉ  सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू

सध्या पेडणेकर रूईया महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत. ग्रीन केमिस्ट्री या विषयात त्यांनी पीएचडी केली आहे

  • Share this:

27 एप्रिल:  तब्बल 10 महिन्यांच्या  अवकाशानंतर आता मुंबई विद्यापीठाला अखेर  नवे कुलगुरू मिळाले आहेत. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती होणार आहे.

गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन मुल्यांकनांचे घोळ झाले होते. यामुळे मुंबई विद्यापीठाचे निकाल तब्बल सहा महिने उशिरा तर लागलेच पण अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. या घोळांमुळे तत्कालीन कुलगुरू संजय देशमुख यांना हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर  गेले 10 महिने  विद्यापीठाला कुलगुरू नव्हते. कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रकुलगुरू म्हणून काम पाहत होते. पण आता मात्र डॉ सुहास पेडणेकर  हा पदभार स्विकारणार आहे.

सध्या पेडणेकर रूईया महाविद्यालयाचे प्राचार्य  म्हणून  काम पाहत आहेत. ग्रीन केमिस्ट्री या विषयात त्यांनी पीएचडी केली आहे. 28 वर्ष अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे.  2012  साली त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. तसंच रसायनशास्त्राचे उत्तम शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. अनेक शैक्षणिक संशोधन संस्थांचे ते माजी सदस्यीह आहेत. रूईया महाविद्यालयाचा दर्जा त्यांच्या काळात सुधारला असून रूईया महाविद्यालयाला त्यांच्या  काळातच स्वायत्तता मिळाली आहे.

आता सुहास पेडणेकर य मुंबई विद्यापीठाची आव्हानं कशी पेलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: April 27, 2018, 1:52 PM IST

ताज्या बातम्या