S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

दिलदार शत्रू नेहमी चांगलाच, निदान पाठीवर वार तर करत नाही -मुनगंटीवार

पाठीमागून वार करणाऱ्या मित्रापेक्षा समोरून वार करणार केव्हाव्ही चांगला असतो असं म्हणत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला डिवचलंय.

Sachin Salve | Updated On: Oct 24, 2017 06:27 PM IST

दिलदार शत्रू नेहमी चांगलाच, निदान पाठीवर वार तर करत नाही -मुनगंटीवार

24 आॅक्टोबर : दिलदार शत्रू हा नेहमी चांगलाच असतो, पाठीमागून वार करणाऱ्या मित्रापेक्षा समोरून वार करणार केव्हाव्ही चांगला असतो असं म्हणत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला डिवचलंय.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीची माहिती देताना सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलदार विरोधक

अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पवारांनी पक्षीय भेदाभेद कधीच केला नाही. पवारांसारखा दिलदार विरोधक बरा असे उद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी स्वार्थी मित्र नको म्हणत अप्रत्यक्ष शिवसेनेला टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याची रिघ ओढत सुधीर मुनगंटीवारांनी सेनेला टोला लगावला.मुख्यमंत्र्यांनी जे व्यक्तव्य केले ते वर्षांनुवर्षे चालत आलेलं आहे, दिलदार शत्रू हा नेहमी चांगलाच असतो, पाठीमागून वार करणाऱ्या मित्रापेक्षा समोरून वार करणार केव्हाव्ही चांगला असतो असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

दरम्यान, राज्याकडे जीएसटी कमी करण्यासाठी तसंच वगळ्यासाठी अनेक निवेदनं आली. राज्य सरकार या निवेदनाला पत्र जोडून जीएसटी कौन्सिलला पाठवतंय. यातील काही महत्वाची निवेदनवर राज्य सरकार देखील मत देते.  राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला 99 टक्के  जीएसटी काँसिलने मान्यता दिली आहे. महाराष्ट्राच्या व्यापारी, उद्याओग आणि कर दात्याला त्रास होऊ नयेत याची काळजी आम्ही घेतली. मातीच्या मुर्त्यावर जीएसटी कर होता तो हटवला. तसंच छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रत्येक वस्तूवरचा कर

रिएल इस्टेट, जमिनीवर किती कर लावला जावा याचा अभ्यास सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

भाजपमध्ये कोणीही नंबर दोन किंवा तीन नसतं, हा सामूहिक पक्ष आहे, हजारो प्रचारक आहे ज्यांनी आपलं आयुष्य पक्षाला दिलं आहे. त्यामुळे दोन नंबर आणि तीन नंबरसाठी चुरस नाहीये असंही मुनगंटीवार यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close