• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेताच भाजप नेत्याने केलं मोठं विधान, म्हणाले...

राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेताच भाजप नेत्याने केलं मोठं विधान, म्हणाले...

मनसेने देशहित या विविध विषयांवर आपली विचारधारा उद्या वेगळी केली तर विचारधारा एक असेल समविचारी एकत्र येण्यात कधीही अडचण नसते

  • Share this:
भिवंडी, 23 जानेवारी : . 'जर दोन्ही पक्षांच्या विचारांमध्ये समानता असल्यास युती होते. या मुद्द्यावर भाजप आणि मनसे यांचे विचार जुळले तर युती शक्य आहे, असे स्पष्ट संकेत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते भिवंडीत बोलत होते. मुंबईमध्ये मनसेचं अधिवेशन पार पडलं. मनसेनं हिंदुत्त्वाची भूमिका घेतल्यामुळे भाजपने राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केलाय. त्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला टाळी देण्याचा प्रयत्न केला. मनसेने  देशहित या विविध विषयांवर आपली विचारधारा उद्या वेगळी केली तर विचारधारा एक असेल समविचारी एकत्र येण्यात कधीही अडचण नसते. जर दोन्ही पक्षांच्या विचारांमध्ये समानता असल्यास युती होते, राष्ट्रहित बघत असताना सर्व जनतेचा सन्मान करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील राज्य घडविण्याचा प्रयत्न करणे या मुद्द्यावर भाजप आणि मनसे यांचे विचार जुळले तर युती शक्य आहे, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. मनसेने आपल्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या झेंड्यात भगव्या रंगाला सर्वोच्च स्थान देत शिवसेनेच्या काँग्रेससोबत जाण्यानंतर हिंदुत्वाकडे वाटचाल करण्यास मनसेनं नव्याने सुरुवात केल्याबाबत बोलले जात असून या मुळे शिवसेनेला नुकसान पोहचणार, असंही  सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 'बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या असंख्य शिवसैनिकांची सध्या घुसमट सुरू असून ती पोकळी मनसे  भरून काढू शकते, असंही ते म्हणाले. तसंच राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्या बाबत विचारले असता त्यांनी केलेली टीका आपण लक्षात ठेवतो तर त्याच राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये जाऊन विकासाच्या मॉडेलचे भरभरून कौतुक केलेले विसरता कामा नये, असं सांगत भाजप मनसेसोबत नव्या युती संदर्भात सुतोवा केलं आहे. 'शिवसेनेनं विचारधारा सोडली' विचारांमध्ये एकवाक्यता, विचारांमध्ये समानता असली की युती होते. शिवसेनेसोबत आमची युती विचारांमध्ये समानता होती. राष्ट्रहित सर्वोतोपरी भावना होती. सत्ता नसून सत्या हे श्रेष्ठ असल्याची भावना होती. पण आता शिवसेनेनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून काँग्रेसची विचारधारा शिवसेनेला सत्तेसाठी जवळची वाटायला लागली, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. मी मराठी आणि हिंदू देखील आहे, मनसे अधिवेशनात राज ठाकरेंची गर्जना दरम्यान, राज ठाकरे हे हिंदुत्वाची भूमिका घेणार, मनसे कात टाकत नव्या अवतारात येणार अशी चर्चा गेली काही दिवस होत होती. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष मनसेचे राज ठाकरेंच्या भाषणाकडे लागलं होतं. राज ठाकरे यांनी नेहमीच्या आपल्या आक्रमक शैलीत भाषण करत मनसेची नवी भूमिका जाहीर केली. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात "जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो......"  अशी केली. नेहमी ते माझ्या मराठी बंधू , भगिनी आणि मातांनो अशी करत असत. पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांचं शॅडो कॅबिनेट तयार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. हे लोक सरकारवर नियंत्रण ठेवतील असंही ते म्हणाले. पक्षाचा झेंडा का बदलला याचा खुलासाही त्यांनी केला. घुसखोरांच्या प्रश्नावर मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं. घुसखोरांना हाकलण्यासाठी माझा केंद्र सरकार पाठिंबा आहे असंही ते म्हणाले. राज ठाकरे काय म्हणाले? मनसेची सुरुवात करताना जो झेंडा माझ्या मनात होता तोच हा झेंडा आहे असा खुलाला त्यांनी केली. गेली अनेक दिवस या झेंड्याची चर्चा सुरू होती. जेव्हा आम्ही मनसेच्या पंचरंगी झेंड्यांची चर्चा करत होतो तेव्हा खूप चर्चा झाली. त्यावेळी तो झेंडा आम्ही घेतला. मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे... मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन. जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही. पण सरसकट कोणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते. हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेंव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली आहे. धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही. आणि बांग्लादेशी मुस्लिमांना हाकलून द्या हे सांगणारा पण मीच होतो.
Published by:sachin Salve
First published: