भाजपचे 'हे' दोन दिग्गज नेते शिवसेनेशी जागावाटपावर चर्चा करणार!

भाजपचे 'हे' दोन दिग्गज नेते शिवसेनेशी जागावाटपावर चर्चा करणार!

राज्यात 288 जागांवर महायुतीचे उमेदवार हाच आमचा फॉर्म्युला असल्याचं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 2 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार हे आता पक्क झालंय. त्यामुळे भाजप स्वबळवार लढणार या केवळ अफवा आहेत हे स्पष्ट झालंय. येत्या 10 दिवसांमध्ये जागावाटपाची चर्चा होणार असून भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिवसेनेशी वाटाघाटी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन नेत्यांवर चर्चेची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात 288 जागांवर महायुतीचे उमेदवार हाच आमचा फॉर्म्युला असल्याचं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय.

मागची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी लढवली होती. त्यातल्या काही जागा भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत. पण काही जागांवरून भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी सुरू आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झालं आहे. त्यामुळे पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं काय करायचं हाही प्रश्न या पक्षांसमोर आहे.

'युती'चा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार', शिवसेनेची गुगली!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईत होते. त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोलापूरमध्ये सांगता झाली. त्यामुळेच आता जागावाटपावर जास्त लक्ष केंद्रित केलं जाईल, अशीही माहिती आहे.

फडणवीसच मुख्यमंत्री होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी रात्री सोलापूरमध्ये समारोप झाला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. शरद पवार यांनी आपल्या कार्यकाळात काय केलं त्याचा जाहीर खुलासा करावा आम्ही पाच वर्षात काय केलं ते सांगू असं जाहीर आवाहनच दिलं. सभा संपताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्यासाठी मतदान करा असं आवाहन करत शिवसेनेवर दबावही निर्माण केल्याचं बोललं जातंय.

'मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही' अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातंय. सत्तेची वाटणी सम-समान होणार असंही सांगितलं जातंय. या सभेत अमित शहा यांनी भाजप-सेना युतीचं सरकार येणार असं सांगितलं मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील असंही स्पष्टपणे जाहीर केलं. त्यामुळे शिवसेनेच्या दबावाचा परिणाम होणार नाही असंही स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकंलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 06:28 PM IST

ताज्या बातम्या