मुंबई 02 मार्च : रश्मी ठाकरे या 'सामना'च्या संपादक झाल्यानंतर आजच्या अग्रलेखात त्यांनी चंद्रकांत पाटलांवर कठोर टीका केली होती. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ आहेत. तेसुद्धा आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून नको तिथे जीभ टाळ्यास लावीत आहेत अशी टीका केली होती. त्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. रश्मी वहिनी या कर्तृत्वान आहेत. त्यांचं मी कौतुक केलं होतं. मात्र त्यांच्याकडून अशा टीकेची अपेक्षा नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलीय. मी अग्रलेख लिहित नाही असं जर त्या म्हणत असतील तर मग संपादक का झालात असा प्रश्न उरतोच असंही ते म्हणाले. आम्हालाही टीका करता येते मात्र मर्यादा कुणीही सोडू नये असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, रश्मी ठाकरे यांनी सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद स्विकारावं असं मी काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो. त्यावेळी त्यांनी ठाकरे घराण्यात पदं घेत नाहीत असं सांगितलं होतं. आता सगळीच पदं ते घेत आहेत असं कसं असा सवालही त्यांनी केला.
काय आहे प्रकरण?
भाजप आणि शिवसेनेमधले आरोप-प्रत्यारोप थांबायला काही तयार नाहीत. शिवसेनेने पुन्हा एकदा भजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केलीय. पाटील यांनी औरंगाबादचे तातडीने संभाजीनगर असं नामकरण करा अशी मागणी केली होती. त्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आलाय. औरंगाबादचं या आधीच बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर असं नामकरण केलंय. त्यामुळे पाटील यांनी उगाच तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. भाजपचे नेत्यांचं बरच काही सरकलं आहे असंही शिवसेनेने म्हटलं आहे. दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधडय़ा भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती. दादामियां, हे ध्यानात ठेवा! असंही 'सामना'त म्हटलं आहे.
CM उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थाना बाहेर पिस्तुलासह तरुणाला अटक
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वागण्या-बोलण्याला तसा काही अर्थ उरलेला नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे राज्यातील मंडळी सध्या जे बोलतात आणि करतात त्यात त्यांचे वैफल्यच दिसून येते. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ हेसुद्धा आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून नको तिथे जीभ टाळय़ास लावीत आहेत. आता त्यांनी संभाजीनगरात जाऊन अशी आपटली आहे की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे ‘औरंगाबाद’चे नामकरण झालेच पाहिजे.’’ भाजपच्या दादामियांचा आवेश आणि जोर पाहता या मंडळींची फक्त जीभच सटकली आहे असे नाही, तर बरेच काही सटकले आहे हे नक्की.
अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक आक्रमक
महाराष्ट्रात कोणीही ‘औरंगजेबा’चे वंशज नाहीत. औरंगजेबाला महाराष्ट्राने कायमचे गाडले आहे. त्याबद्दल सगळय़ांनाच सार्थ अभिमान आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांचे लोक गेल्या पाचेक वर्षांपासून छत्रपती शिवाजीराजांचे नाव घेत आहेत व आता तर ‘पंतप्रधान मोदी हेच शिवाजी महाराज’ अशी पुस्तके छापून वाटण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे आपण नक्की कोणाचे वंशज आहोत हे त्यांनी सांगायला हवे. ‘‘औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ झालेच पाहिजे’’ असे त्यांनी
'दिल्लीतल्या दंगली काँग्रेसने घडवल्या', रामदास आठवले यांचा गंभीर आरोप
पाच वर्षे महाराष्ट्रात तुमचेच सरकार होते, केंद्रातही तुम्हीच आहात. मग पाच वर्षांत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ का करू शकला नाहीत? तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्या झटक्यात वाराणसीचे प्रयागराज केले. इतरही नावे-गावे बदलली. त्यांना कोणीच अडवले नाही. मग श्री. फडणवीस यांना औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करायला कोणाची परवानगी हवी होती? बाबर, अफझलखान, शाइस्तेखान, औरंगजेब हे सर्व मोगल सरदार आक्रमक होते असे व्याख्यान देण्याची गरज नाही आणि भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते. औरंगजेबाचे पिशाच गाडून ‘‘औरंगाबाद नव्हे, आजपासून हे संभाजीनगर आहे,’’ असे ठणकावून सांगणारे शिवसेनाप्रमुखच होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.