मनसेच्या दणक्याने अखेर अ‍ॅमेझॉन वठणीवर, मराठीचा लवकरच पर्याय!

मनसेच्या दणक्याने अखेर अ‍ॅमेझॉन वठणीवर, मराठीचा लवकरच पर्याय!

अखेर मनसेच्या 'खळळ-खट्याक' आंदोलनापुढे अ‍ॅमेझॉनला नांगी टाकावी लागली आहे. अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : 'मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन (amazon) नाही', असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) अ‍ॅमेझॉन विरोधात आक्रमक आंदोलन पुकारले होते. अखेर मनसेच्या 'खळळ-खट्याक' आंदोलनापुढे अ‍ॅमेझॉनला नांगी टाकावी लागली आहे. अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे.

अखेर ॲमेझॉन मनसेच्या आंदोलनापुढे नांगी टाकली. लवकरच मराठीमध्ये येत असल्याचा ॲमेझॉन आपल्या साइटवर नमूद केले आहे. शुक्रवारी ॲमेझॉनच्या पुणे आणि मुंबईतल्या गोडाऊनवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी  हल्लाबोल केला होता.  मनसे कार्यकर्त्यांनी खळ्ळ खट्याक स्टाईलने तोडफोड केली होती. त्यानंतर वसईमध्येही अ‍ॅमेझॉन च्या गोडाऊनची तोडफोड करण्यात आली होती.

 अखेर लवकरच मराठीमध्ये येत असल्याचा ॲमेझॉन चा वेबसाईटवर खुलासा केला आहे. ॲमेझॉनने आपल्या वेबसाईटवर इतर भाषांना प्राधान्य दिले असले तरी मराठीत मात्र वेबसाईट करण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे आक्रमक होत मनसेने अनेक वेळा ॲमेझॉनला सुधारणा करण्यास सांगितले होते.

परंतु, ॲमेझॉनने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉन च्या कार्यालयाची तोडफोड केली होती. अखेर मनसेच्या दणक्यापुढे अॅमेझॉनला नमते घ्यावेच लागले.

Published by: sachin Salve
First published: December 26, 2020, 11:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या