Home /News /mumbai /

स्थानिक निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला 'अच्छे दिन', गुप्तचर विभागाचा महत्त्वाचा रिपोर्ट!

स्थानिक निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला 'अच्छे दिन', गुप्तचर विभागाचा महत्त्वाचा रिपोर्ट!

महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. एकीकडे विरोधक हे सरकार कोसळण्याचे मुहूर्त काढत आहे. तर दुसरीकडे गुप्तचर विभागाने स्थानिक निवडणुका घेतल्या तर...

    मुंबई, 25 डिसेंबर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi government) स्थापन केले. महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. एकीकडे विरोधक हे सरकार कोसळण्याचे मुहूर्त काढत आहे. तर दुसरीकडे गुप्तचर विभागाने स्थानिक निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे, असा अहवालच दिला आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाउन लागल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता ग्रामपंचायत आणि स्थानिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्यातील निवडणुकांबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, आगामी महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीला यश मिळेल, असा अंदाज वर्तवल्याचे वृत्त टीव्ही 9 वृत्तवाहिनीने दिले आहे. मुंबईत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून रेल्वेतून फेकलं! शिवसेना नेत्या संतापल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक  लढवत भाजपला आस्मान दाखवले आहे. सहा पैकी पाचही जागेवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. गुप्तचर विभागाने याबद्दलचा अहवाल हा ठाकरे सरकारकडे सुपूर्द केला आहे. या अहवालामुळे महाविकास आघाडीच्या आत्मविश्वासात आणखी भर पडली आहे. तर भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरले आहे. आगामी काही दिवसांत राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर, औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि वसई-विरार महापालिकेचीही निवडणूक होणार आहे. विधान परिषदेत एकत्र निवडणूक लढल्यामुळे महाविकास आघाडीने भाजपला मैदानाच्या बाहेर उभे केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची चिन्ह आहे. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं नेतृत्व केलेले मराठमोळे शिलेदार! दुसरीकडे विधान परिषदेत पराभवाचं तोंड पाहावं लागल्यामुळे भाजपला जिव्हारी लागले आहे. भाजपने मिशन मुंबई, ग्रामपंचायत निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपमधील बंडखोरी ही भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मराठवाडा आणि नागपूरमध्ये भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे भाजपला डॅमेज कंट्रोलसह मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेत दणदणीत विजय मिळवल्यामुळे महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकांसाठी तिन्ही पक्षांनी आपआपल्या बालेकिल्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी लढत आणखी रंजक होणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: भाजप, शिवसेना

    पुढील बातम्या