Mumbai Rain : मध्य रेल्वेवर उद्या रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार

मुंबईत पावसाचा जोर पाहता मध्य रेल्वेनं बुधवारी लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 10:31 PM IST

Mumbai Rain : मध्य रेल्वेवर उद्या रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार

मुंबई, 2 जुलै : मुंबईत पावसाचा जोर पाहता मध्य रेल्वेनं बुधवारी लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी (3 जुलै) मध्य  रेल्वे रविवारच्या वेळापत्रकानुसार चालणार आहे. यानुसार मध्य रेल्वेवर कमी लोकल धावतील. येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे सीपीआरओ सुनील उदासी यांनी दिली आहे.

Loading...

(पाहा :SPECIAL REPORT : मृत्यूची भिंत ! पुण्यात आणखी 6 निष्पापांचा बळी)

शनिवारपासून (29 जून) मुंबई आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे रस्ते, रेल्वे तसंच हवाई प्रवासावरही परिणाम होत आहे. मुंबई लाईफलाईन असणारी लोकल तर मुसळधार पावसामुळे अगदीच कोलमडली आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यादेखील रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा ठिकठिकाणी खोळंबा होत आहे.

(पाहा :VIDEO : पाण्याखाली गेलेल्या पुलावरचा थरारक प्रवास, बाईकसह तरुण गेला वाहून)

3 जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या लोकल

1)    11093 मुंबई-वाराणीस महानगरी एक्स्प्रेस

2)    51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर

3)    12169 पुणे-सोलापूर एक्स्प्रेस

(पाहा :VIDEO : सावधानतेचा इशारा ! पुढील 48 तासांत कोसळ'धार')

4)    12170 सोलापूर-पुणे एक्स्प्रेस

5)    12127 मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस

6)    12128 पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस

7)    11010 पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस

8)    11009 मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस

9)    11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस

10)   11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस

11)   12125 मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस

12)   12126 पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस

13)   22102 मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

14)   22101 मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस

15)   12118 मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस

16)   12117 एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस

17)   51317 पुणे-पनवेल पॅसेंजर

18)   51318 पनवेल-पुणे पॅसेंजर

VIDEO : कार चालकांनो पाहा 'हा' व्हिडीओ, सावध राहा तुमचाही जाऊ शकतो जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...