शेतकऱ्यांच्या घरातल्या तुरीचं काय ?, पणनमंत्र्यांनाच माहिती नाही

शेतकऱ्यांच्या घरात पडलेल्या तुरीचं करायचं काय याचं सरकारकडे उत्तर नाही. पणनमंत्री सुभाष देशमुखही गोंधळलेल्या स्थितीत आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2017 07:37 PM IST

शेतकऱ्यांच्या घरातल्या तुरीचं काय ?, पणनमंत्र्यांनाच माहिती नाही

28 एप्रिल : बाजार समितीत नोंदणी झालेली तूर खरेदी केली जातेय. पण शेतकऱ्यांच्या घरात पडलेल्या तुरीचं करायचं काय याचं सरकारकडे उत्तर नाही. पणनमंत्री सुभाष देशमुखही गोंधळलेल्या स्थितीत आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांची तूर कोंडी काही केल्या दूर होत नाहीये. राज्य सरकार २२ एप्रिल पर्यंतच तूर खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार आहे. मग २२ एप्रिल नंतरच्या तूर उत्पादनांचे काय करणार...? या प्रश्नावर राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांना प्रश्नं विचारला असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळून काढता पाय घेतला. पण, 22 एप्रिलपर्यंत नोंद झालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल एवढंच आश्वासन काय ते देशमुखांनी दिलं. पण, शेतकऱ्यांच्या घरच्या तुरीबद्दल पणनमंत्र्यांनाच काहीच माहिती नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 07:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...