• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईंचा राजीनामा फेटाळला !

मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईंचा राजीनामा फेटाळला !

ईगतपुरी एमआयडीसी जमीन हस्तांतर घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण मुख्यमंत्र्यानी त्यांचा राजीनामा फेटाळलाय.

  • Share this:
मुंबई, प्रतिनिधी, 12 ऑगस्ट : ईगतपुरी एमआयडीसी जमीन हस्तांतर घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण मुख्यमंत्र्यानी त्यांचा राजीनामा फेटाळलाय. देसाई यांनी आज सकाळी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि राजीनामा देऊ केला. पण मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. काल अधिवेशानाच्या समारोपावेळी विरोधकांनी देसाईंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यावर देसाईंनी हे पाऊल उचललं होतं. पण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या दोघांकडूनही देसाईंना तूर्तास अभय मिळाल्याचं स्पष्ट होतंय. दरम्यान, विरोधकांनी देसाईंची राजीनामा ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचा आरोप केलाय. मुख्यमंत्र्यांना जर खरंच तटस्थपणे या घोटाळ्याची चौकशी करायची असेल तर त्यांनी देसाईंचा तात्काळ राजीनामा घ्यावा, आणि नौटंकी बंद करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी दिलीय.
First published: