मुंबई, 17 जानेवारी: IIT बॉम्बेच्या (IIT Bombay) एका विद्यार्थ्यांने (student) आत्महत्या (committed suicide) केल्याची घटना घडली आहे. पहाटे 4.30 विद्यार्थ्यांनं आपलं जीवन संपवलं आहे. हॉस्टेलच्या (Hostel) 7 व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यानं आत्महत्या केली आहे. डिप्रेशनमध्ये (Depression) त्यानं आत्महत्या केल्याचं समजतंय.
IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यानं हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. पहाटे 4.30 वाजता ही घटना घडली आहे. आत्महत्या करणारा विद्यार्थी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. या घटनेनंतर विद्यार्थ्याला राजावाडी रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. मृत विद्यार्थी डिप्रेशनचा बळी होता असं सांगण्यात येत आहे.
वयाच्या 83 व्या वर्षी देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक बिरजू महाराज यांचं निधन
मास्टर्सच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांचं वय 27 वर्षे होतं. या विद्यार्थ्याने आज पहाटे 4.30 वाजता आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितले. हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणाची माहिती मिळताच मुलाला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्याला डिप्रेशनची समस्या होती आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, असं एका विद्यार्थ्याने सांगितलं. मुलाने आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरलेलं नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
Credit Card स्टेटमेंटमध्ये मिळते खर्चाची डिटेल माहिती, वाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून विद्यार्थ्यानं सुसाईड नोट लिहिली आहे का याचा तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.