घृणास्पद.. वर्गातच तरुणीवर शिक्षकाने केला बलात्कार, आधीही झाला होता अतिप्रसंग

घृणास्पद.. वर्गातच तरुणीवर शिक्षकाने केला बलात्कार, आधीही झाला होता अतिप्रसंग

पीडित तरुणी महेश टुटोरिअल्स क्लासेसमध्ये पार्टटाइमचे काम करते.

  • Share this:

नवी मुंबई, 16 ऑक्टोबर: खारघर येथे गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. तरुणीवर एका शिक्षकाने वर्गातच बलात्कार केला. महेश टुटोरिअल क्लासमध्ये ही घटना घडली आहे. दीपेश जैन असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो फरार आहे. पीडित तरुणी महेश टुटोरिअल्स क्लासेसमध्ये पार्टटाइमचे काम करते. दरम्यान, दुसऱ्या एका शिक्षकानेही 8 दिवसांपूर्वी पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र,परिस्थितीमुळे आणि घाबरलेल्या पीडितेने 2 दिवस घरच्यांना सांगितले नाही. अनुप शुक्ला असे त्या नराधनाचे नाव असून तोही फरार आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

खेळखंडोबा, दीर आणि त्याच्या मित्रांनी वहिणीवर केला सामूहिक बलात्कार!

सध्या बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिण्यात प्रेम आणि नात्याला काळिमा फासणारी घटना घडली होती. सामूहिक बलात्काराच्या एका घटनेने भिवंडी शहर हादरले होते. एका विवाहित महिलेवर तिच्या दीरासह चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

भिवंडी शहरातील अंजुरफाटा परिसरात ही घटना घडली होती. भिवंडी रोड रेल्वे स्टेशन परिसरातील निर्जण झुडपात 25 वर्षीय विवाहितेवर दीर आणि त्याच्या चार मित्रांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बलात्कार झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. पण नारपोली पोलिसांनी आरोपींचा शोध घेत सगळ्यांनी ताब्यात घेतले होते. आधी दीराने नंतर त्याच्या त्याच्या 3 मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केला. आरोपींमध्ये 2 जण अल्पवयीन आहेत. नारपोली पोलिस पुढील तपास करत आहेत.

राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचं घणाघाती UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2019 09:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading