मुंबई, 04 एप्रिल : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊन (maharashtra lockdown ) लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून सर्व चाचपणी सुरू आहे. यावर तोडगा म्हणून राज्यात लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे. दोन टप्प्यात किंवा संपूर्ण एप्रिल महिन्यात कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये 5 एप्रिल ते 18 एप्रिल किंवा 30 एप्रिलपर्यंत असे कडक निर्बंध लावावे का असा मुद्दा कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थितीत केला आहे. लॉकडाऊन न करता कडक निर्बंध करावे असा सूर कॅबिनेट मंत्र्यांनी लगावला आहे.
आमच्याविरोधात गुन्हा दाखल का केला? सोलापूरमध्ये फिर्यादीवर प्राणघातक हल्ला
तसंच जिल्हा बंदी करू नये, अत्याआवश्यक सेवा, उत्पादन निर्मिती व्यवसाय चालू ठेवावे, हॉटेल्स मॉल्स पूर्ण वेळ बंद करता येईल का या विषयावर कॅबिनेट मंत्री चर्चा करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसंच, मागील वर्षात झाल्या प्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन आता नको ही भूमिका कॅबिनेट बैठकीत काही मंत्र्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध नावाखाली नियमावली करण्याची भूमिका कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांनी मांडली आहे.
12 आणि 10 परीक्षा कालावधीत कोरोना वाढला तर भविष्यात तसा पुढे निर्णय घ्यावा लागेल. काही राज्यात कोरोना वाढला तिथे परिक्षा पुढे ढकल्या पण परीक्षा घेतल्या गेल्या, जसा कोरोना वाढतो तसा पुढे निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील.
Mumbai Airport: कोरोना गाइडलाइन्सचं पालन न केल्यास 1000 रुपयांचा दंड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध नेत्यांशी फोनवरुन राज्यातील कोरोनाबद्दल चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाऊन शब्द वापरला नव्हता. कडक निर्बंध लागू करावे लागतील असं म्हटलं होतं. त्यानुसार राज्यात आता लॉकडाऊन नसेल पण कडक निर्बंध मात्र असतील. वाईन शॉप येथे 'टेक अवे' हे पुन्हा चालू करावे, वाईन आणि बार रेस्टारंट परिसरात दारू पिण्यास मनाई करण्यात येणार आहे.
याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहे. नेमकी कशा पद्धतीने नियमावली करायची याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे.
दरम्यान,राज्यात लॉकडाऊन लागू करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षांसोबत चर्चा करत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा फोनवर चर्चा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. यावेळी दोन्ही नेत्यांमद्य सांगितले की परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे काही निर्बंध कडक करावे लागतील. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले की, आवश्यक त्या उपाययोजनांना आम्ही सहकार्य करु. आम्हाला कोरोनाबाबत राजकारणापेक्षा जनतेचे हित कायम महत्वाचे राहिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.