मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियमावली जाहीर, मुख्य सचिव चक्रवर्तींचा पहिला आदेश

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियमावली जाहीर, मुख्य सचिव चक्रवर्तींचा पहिला आदेश


'आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या प्रत्येक प्रवाशाला आपल्या मागच्या पंधरा दिवसांमध्ये प्रवासाचा तपशील द्यावा लागणार आहे.

'आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या प्रत्येक प्रवाशाला आपल्या मागच्या पंधरा दिवसांमध्ये प्रवासाचा तपशील द्यावा लागणार आहे.

'आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या प्रत्येक प्रवाशाला आपल्या मागच्या पंधरा दिवसांमध्ये प्रवासाचा तपशील द्यावा लागणार आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 30 नोव्हेंबर : कोरोनाचा (corona) घातक नवी व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) आढळून आल्यामुळे राज्य सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी नवी नियमावली तयारी केली आहे. यापुढे परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे, असा असा आदेश राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty)  यांनी काढले आहे.

देबाशिष चक्रवर्ती यांनी मुख्य सचिवांचा पदभार स्विकारल्यानंतर तातडीने कामाला लागले आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राज्याच्या नवनिर्वाचित मुख्य सचिवांच्या सहीसह विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पहिला आदेश निर्गमित झाला आहे.

'आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या प्रत्येक प्रवाशाला आपल्या मागच्या पंधरा दिवसांमध्ये प्रवासाचा तपशील द्यावा लागणार आहे. ही तपशील इम्मिग्रेशनला तपासावे लागेल जर माहिती खोटी आढळली तर त्या प्रवाशाच्या विरोधात डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत कारवाई केली जाईल, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

काकीवरील प्रेमासाठी पत्नीची केली हत्या; अनैतिक संबंधाचा भयावह शेवट

ओमायक्रोनने बाधित असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेल्या देशांमधून जर प्रवासी आले तर त्यांना सात दिवस विलगीकरण ठेवावे लागणार आहे. दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांची rt-pcr टेस्ट केली जाईल आणि जर rt-pcr चाचणी जर पॉझिटिव्ह आली तर रुग्णालयात दाखल केले जाईल.

बाधित देशानं व्यतिरिक्त इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची rt-pcr चाचणी बंधनकारक करून प्रत्येक प्रवाशाला चौदा दिवस घरीच विलगीकरण आत राहावे लागेल, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

..तेव्हा समंथा प्रभूने सेक्ससाठी खाणंही सोडलं; फूडऐवजी निवडलं होतं Sex

दरम्यान,  केंद्र सरकारने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवासाच्या नियमावलीत बदल केले आहेत. ही नियमावली (India New Travel Rules) केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली असून आज मध्यरात्रीपासून ही नवी नियमावली देशभरात लागू होणार आहे.

ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विमानतळ आणि बंदरांवर बारकाईने बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. कुणी संशियत आढळल्यास तातडीने जीनो सीक्वेंसिंग केली जात आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना टेस्टिंग वाढवण्याची, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारने जारी केलेली नवी नियमावली पुढीलप्रमाणे:

ज्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे अशा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट होईपर्यंत त्यांची विमानतळावर राहण्याची सुविधा करण्यात यावी. प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा त्यांची टेस्ट केली जाईल. राज्यातील अधिकारी अशा प्रवाशांच्या घरी जावून याबाबतची व्यवस्था करतील.

ज्या प्रवाशाची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्या प्रवाशाचे सॅम्पल जीनोम सीक्वेंसिंगसाठी आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत तातडीने पाठण्यात यावे. याशिवाय राज्यातील संक्रमित व्यक्तींची माहिती घ्यावी. तसेच 14 दिवस पूर्ण झाल्यानंतरही त्यांचा फॉलोअप घ्यावा.

IPL 2022 : Rajasthan Royals चा स्टोक्स-आर्चरला धक्का, महागडा खेळाडूही बाहेर

प्रत्येक राज्याने आपापल्या विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवावं. आता पुन्हा टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि वॅक्सिनेट या रणनितीवर जोर दिला जातोय. सर्व राज्यांना वेगाने टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ओमायक्रोन विषाणूची ओळख आरटीपीसाआर किंवा रॅपिड अॅटिजेन टेस्टमधून होऊ शकते.

ज्या परिसरात मागच्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ होताना दिसतेय अशा भागात सर्वाधिक लक्ष देण्याचे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आलं आहे.

First published: