Home /News /mumbai /

मुंबईतील या 5 भागांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन? रुग्णसंख्या वाढल्यानंतर पोलिसांनीच केली मागणी

मुंबईतील या 5 भागांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन? रुग्णसंख्या वाढल्यानंतर पोलिसांनीच केली मागणी

मुंबईतील ठराविक भागात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

    विवेक गुप्ता,मुंबई, 20 जून : महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राजधानी मुंबईत सातत्याने वाढत असलेली रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. अशातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अनेक भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता थेट मुंबई पोलिसांनीच महानगरपालिकेकडे एक मागणी केली असून मुंबईतील ठराविक भागात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने 5 परिसरात कडक लॉकडाऊन करण्याची गरज आहे, असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. यामध्ये समता नगर, कुरार अप्पापाडा, कुरार गाव, मड परिसर आणि मालाडमधील काही भागात लॉकडाऊन करण्याची मागणी आहे. मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली लॉकडाऊनची मागणी पूर्ण झाल्यास या भागांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसंच अत्यावश्यक कामांशिवाय घरातून बाहेर पडण्याची परवानगीही देण्यात येऊ नये, अशीही मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना संसर्गाला अटकाव करणं शक्य होणार आहे. रुग्णांची संख्या का वाढतेय? आरोग्यमंत्र्यांचं उत्तर लॉकडाऊन नंतर आता अनलॉकची प्रोसेस सुरू झाली आहे. त्यामुळे गर्दी वाढत आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे असं सांगितलं जात आहे. मात्र अनेकदा लोक हे नियम पाळत नाहीत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याची शक्यता आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. देशभरात आकडा वाढताच.. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. आज सलग सातव्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा 10 हजारहून अधिक आहे. आज 24 तासांत तब्बल 14 हजार 516 नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 लाखांच्या घरात गेला आहे. संपादन - अक्षय शितोळे
    First published:

    Tags: Lockdown, Mumbai news

    पुढील बातम्या