मुंबईत वाहन चालविणार असाल तर दोन वेळा विचार करा, पोलिसांनी दिला कडक कारवाईचा इशारा

मुंबईत वाहन चालविणार असाल तर दोन वेळा विचार करा, पोलिसांनी दिला कडक कारवाईचा इशारा

पोलीस कारवाई तर करतील पण त्याच बरोबर वाहनही जप्त करतील असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

  • Share this:

मुंबई 18 ऑगस्ट: मुंबईत कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकार अनेक उपाय योजना करत आहे. मात्र गर्दी कमी होत नसल्याने आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. विना परवाना वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध आणि गरज नसतांनाही वाहन बाहेर काढणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

फक्त नियम मोडले म्हणून केवळ ही कारवाई होणार नाही तर ती तुमच्या सुरक्षेसाठीही आवश्यक आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. मुंबई कोरोनाविरुद्ध महत्त्वाची लढाई लढत आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांनी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस कारवाई तर करतील पण त्याच बरोबर वाहनही जप्त करतील असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

त्यामुळे मुंबईत गाडी चालविणार असाल तर किमान दोन वेळा विचार करा नाहीतर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत संसर्गाचा वेग सर्वात कमी झाल्याचा दावा केला जात आहे, पण चाचण्यांची संख्याही तुलनेने कमी आहे. दर दहा लाख म्हणजे एक मिलीयन लोकसंख्येमागे मुंबईत फक्त 619 चाचण्या होत आहेत. पुण्यातच हेच प्रमाण सध्या 955 वर गेलं आहे. इतर प्रगत देशांच्या तुलनेत हे प्रमाणसुद्धा कमीच आहे.

17 ऑगस्टच्या राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण 6,04,358 रुग्णांपैकी मुंबईत 1,29479 तर पुण्यात 1,32481 कोरोना रुग्ण आहेत. पुण्यातील एकूण रुग्णांपैकी 39424 अॅक्टिव्ह पेशंट्स आहेत. म्हणजे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात देशभरातले सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पण त्याचबरोबर कदाचित पुण्यातच देशभरातल्या सर्वाधिक दैनंदिन चाचण्याही होत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 18, 2020, 11:46 PM IST

ताज्या बातम्या