Home /News /mumbai /

कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत कठोर नियमावली

कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत कठोर नियमावली

आतापर्यंत मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 92 वर पोहोचली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे

    मुंबई, 30 मार्च : मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासंदर्भात काढलेल्या परिपत्रकामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. या परिपत्रकामध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहास दफन करण्यास निर्बंध लावले होते. मात्र सध्या यावर संभ्रम निर्माण झाला आहे मुंबई महानगरपालिकेने एक परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार कोरोनाबळींना दफन करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर या परिपत्रकावर विरोध केला जात आहे. या परिपत्रकामुळे सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेने काढलेल्या या परिपत्रकानुसार मृतदेह पुरण्याबाबत आग्रही असल्यास त्यांना मुंबई बाहेर दफन करावे लागले. काही राजकीय नेत्यांमते पालिकेने परिपत्रक मागे घेतले आहे. मात्र यासंदर्भात नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. अंत्यसंस्काराची सर्व प्रक्रिया पालिकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्याचे बंधन आहे. पालिकेच्या पहिल्या परिपत्रकावर अल्पसंख्यांक मंत्री  नवाव मलिकांनी विरोध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत पालिका आयुक्तांशी बातचीत केल्याचे सांगितले आहे. याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांचा अंत्यसंस्कार रुग्णालयाजवळील स्मशानभूमीत करण्यात येईल. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मृतदेहाला स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासाठी त्या भागातील तत्सम समाजाच्या प्रमुख व्यक्तीची मदत घेण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मृतदेहावर कोविड – 19 च्या नियमावलीचा अवलंब केला जाईल. याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृतदेह घरी घेऊन जाता येणार नाही तर रुग्णालयातून थेट स्मशानभूमीत नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. संबंधित -  मुंबईत लॉकडाऊन अधिक कडक, अनेक भागांमध्ये SRPF च्या तुकड्या तैनात याशिवाय अंत्यसंस्कारासाठी 5 पेक्षा जास्त जण उपस्थित राहू शकणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे बीएमसीकडून सांगण्यात आले आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंग हा यावर एकमेव उपाय आहे. मात्र अनेकदा लॉकडाऊनदरम्यान लोक घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार येत्या काळात यावर कडक नियमावली लागू करणार असल्याचे दिसत आहे. संबंधित -  डोंबिवलीकरांसाठी तो एक दिवस ठरला कोरोनाचा वाहक, आणखी एकाला झाली लागण
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BMC, Coronavirus

    पुढील बातम्या