मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पक्षाला बळकटी; माजी महापौरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पक्षाला बळकटी; माजी महापौरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 18 नोव्हेंबर : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Election) निवडणुकीसाठी आताच सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. देशातील सर्वाधिक मोठी महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये माजी महापौरांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Strengthen the party before the Mumbai Municipal Corporation elections Former mayor joins NCP)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी आज प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

निर्मला सामंत यांच्या प्रवेशाने पक्षाला मुंबई मनपा निवडणुकीत अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या मान्यतेने निर्मला सामंत यांची मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा-भाजपच्या नामनिर्देशित सदस्याविरोधातला खटला BMC हरली, खर्च केले 1 कोटी रुपये!

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्या चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, अर्बन सेल प्रदेश सेक्रेटरी सुरेश पाटील, माजी नगरसेविका अल्पना पेंटर आदी उपस्थित होते.

आगामी पालिका निवडणुकांबाबत मोठा निर्णय

दरम्यान आगामी 18 पालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation elections ) प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुंबई (mumbai) वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी (Corporation elections) तीनचा प्रभाग करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.

First published:

Tags: BMC, Election, Mumbai