थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचं यशाचं स्वप्न अधुरंच राहिलं

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचं यशाचं स्वप्न अधुरंच राहिलं

मुंबई फिरण्याचं यशाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. यशा गुरुवारी (28 डिसेंबर) रात्री चुलत भाऊ आणि बहिणीसोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये जेवायला गेली होती.आणि ती रात्र तिच्या आयुष्यातली शेवटची ठरली.

  • Share this:

29 डिसेंबर : मुंबईचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. तसं गुजरातच्या 22 वर्षाच्या यशालाही होतं. म्हणूनच तिला नववर्षाचं स्वागत मुंबईत करायचं होतं.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यशा ठक्कर गुजरातहून मुंबईला आली होती. थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी तिची तयारी होती. ती पहिल्यांदाच नव्या वर्षाचं स्वागत मुंबईत करणार होती. त्यामुळे ती फारच उत्साहात होती. पण मुंबई फिरण्याचं यशाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. यशा गुरुवारी (28 डिसेंबर) रात्री चुलत भाऊ आणि बहिणीसोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये जेवायला गेली होती.आणि ती रात्र तिच्या आयुष्यातली शेवटची ठरली.

पण तिथे आग लागली आणि पाहता पाहता आग हॉटेलमध्ये पसरली. आग लागल्यानंतर चुलत बहिणी जीव वाचवण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्याने ती बचावली. पण यशा आगीच्या कचाट्यात सापडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशाचे आई-वडील गुजरातहून मुंबईत दाखल झाले आहेत.

First published: December 29, 2017, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading