मेट्रो कारशेडचे काम थांबवा, केंद्राचा ठाकरे सरकारला आदेश

आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प हा कांजूरमार्ग इथं हलवला आहे.

आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प हा कांजूरमार्ग इथं हलवला आहे.

  • Share this:
    मुंबई, 03 ऑक्टोबर : ठाकरे सरकारने आरेतील (aarey forest) मेट्रो कारशेडला (metro car shed ) कांजूरमार्गला (kanjurmarg) हलवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने  (BJP) राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता.  पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे. आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प हा कांजूरमार्ग इथं हलवला आहे.  त्यानंतर कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात देखील झाली आहे. पण, आता केंद्र सरकारने कांजूरमार्गच्या जागेवर दावा केला आहे. गोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी? कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची  असून त्यावरचा हक्का अद्याप सोडला नाही, त्यामुळे ही जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा, असे पत्रच केंद्र सरकारने राज्याच्या सचिवांना पाठवले आहे.  त्याचबरोबर कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरीत थांबावा, असंही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईचा विकास कसा रोखायचा यासाठी केंद्रातील सरकार नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाचे काम थांबविण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केली आहे. भाजप आमदाराची अमिताभ बच्चन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार 'राज्य सरकारने पर्यावरणाचा संरक्षण करत आरे येथील प्रकल्प कांजूरमार्गाला हलविला होता. पण, आता भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने या मुद्द्यावरून राजकारण करत आहे यावरून हेच स्पष्ट होते की, महाविकास आघाडीचे सरकार भाजपाला पचनी पडत नाही. या पद्धतीने इतर राज्यांमध्ये भाजप कार्यरत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील हेच पावले टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असंही  असलम शेख म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published: