वांद्र्याजवळच्या झोपडपट्टीवर कारवाई आठवडाभर थांबवा,कोर्टाचे पालिकेला आदेश

मुंबई पालिकेला कारवाई थांबवून एक आठवडा स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2017 08:01 PM IST

वांद्र्याजवळच्या झोपडपट्टीवर कारवाई आठवडाभर थांबवा,कोर्टाचे पालिकेला आदेश

02 नोव्हेंबर : वांद्रे येथील गरीबनगर भागातील झोपडपट्टीवासियांना हायकोर्टाने दिलासा दिलाय. मुंबई पालिकेला कारवाई थांबवून एक आठवडा स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे.

मुंबईतील वांद्रे इथल्या गरीबनगर येथील जलवाहिनीच्या आसपासच्या बेकायदा झोपडपट्ट्यांविरोधातील मुंबई महापालिकेनं अनधिकृत बांधकाम हटवा कारवाई सुरू केली होती.

कोर्टाने आज या कारवाई एका आठवड्याकरता जैसे थे ठेवा असे आदेश पालिकेला दिले. झोपडपट्ट्यांविरोधातील कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका गरीबनगर येथील स्थानिक निलोफर सलीम कुरेशी यांनी दाखल केली आहे. तर आपली गरीबनगर परिसरातील कारवाई संपली असल्याचं मुंबई मनपानं म्हटलं आहे. पण आपण १९९४ पासून या भागात राहत असून पालिका दावा करत असली तरीही आमच्याही झोपडपट्ट्यांवर कारवाई होऊ शकते असा दावा कुरेशी यांनी केला आहे. पुढील आठवड्यात या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे.

विशेष म्हणजे, मागील आठवड्यात गरीबनगर भागात पालिकेनं अतिक्रमणविरोधी कारवाई करताना तिथे आग लावण्यात आली होती आणि या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...