...अन्यथा मुंबई-ठाणे परिसराचं वाळवंट होईल-हायकोर्ट

...अन्यथा मुंबई-ठाणे परिसराचं वाळवंट होईल-हायकोर्ट

नवी मुंबई आणि ठाण्याच्या परिसरात बेसुमार तिवरांच्या झाडांची कत्तल झालीये. याविरोधात हायकोर्टात विविध याचिका प्रलंबित आहे.

  • Share this:

16 नोव्हेंबर : तिवरांची कत्तल थांबवा अन्यथा मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं वाळवंट होईल अशी भीती आज मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली आहे.

नवी मुंबई आणि ठाण्याच्या परिसरात बेसुमार तिवरांच्या झाडांची कत्तल झालीये. याविरोधात हायकोर्टात विविध याचिका प्रलंबित आहे.  याच संदर्भात ठाणे मनपा आयुक्तांविरोधात एक जनहित याचिका दाखल केलीय. हायकोर्टानं प्रशासनाला यासंदर्भात गांभीर्यानं विचार करण्याची सूचना देत सुनावणी तहकूब केली. यावेळी कोर्टाने याच गतीनं जर तिवरांची कत्तल होत राहिली तर या महानगरांत लोकवस्तीच उरणार नाही, मग आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार? असा सवाल केलाय.

तसंच दुबई आणि अन्य आखाती देशांत लोकं वाळवंटात उद्यान बनवतायत, आपण मात्र त्याच्याउलट जातोय. आज मुंबईत आणि आसपासच्या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती वाढतेय, लोकं जीम, स्विमिंग पूल अश्या अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या आलिशान टॉवरमध्ये राहायला जातायत. पण पर्यावरणाचा समतोल साधला नाही तर निसर्गासमोर एकदिवस सर्व मातीमोल होईल अशीही भितीही मुख्य न्यायमूर्तींनी बोलून दाखवली.

First published: November 16, 2017, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading