संपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू-पक्षांची विक्री बंद करा - हायकोर्ट

आता केवळ क्रॉफर्ड मार्केट नव्हे तर संपूर्ण मुंबईत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या पाळीव पशू- पक्षांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

Samruddha Bhambure | Updated On: May 4, 2017 03:41 PM IST

संपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू-पक्षांची विक्री बंद करा - हायकोर्ट

विवेक कुलकर्णी, 04 मे : संपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू- पक्षांची विक्री बंद करा, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील बेकायदेशीर पशू- पक्षांचा बाजार बंद दुकानांच्या आड सुरुच असल्याचे पुरावे हायकोर्टासमोर आले आहेत. त्याचबरोबर हा बाजार आता कुर्ला आणि बोरिवली परिसरातही वाढल्याचं हायकोर्टाच्या निदर्शनास आणण्यात आलं. त्यामुळे आता केवळ क्रॉफर्ड मार्केट नव्हे तर संपूर्ण मुंबईत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या पाळीव पशू- पक्षांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली प्राणी आणि पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणारी दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश हायकोर्टानं याआधी दिले होते. मात्र तरीही बंद दुकानांच्यासमोर उभं राहून धंदा सुरू असल्याचा अहवाल हायकोर्टानं यासंदर्भात बनवलेल्या समितीनं कोर्टासमोर मांडला.

हे आदेश देताना हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं की, ही दुकानं पुन्हा सुरु होणार नाहीत याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिस स्टेशननं काळजी घ्यावी. मात्र तरीही बेकायदेशीपणे पाळीव पशू- पक्षांची विक्री सुरू असल्याची माहीती फोटोसह कोर्टासमोर आली.यावर उद्यापर्यंत मुंबई महानगरपालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close