मुंबई, 16 नोव्हेंबर : भाजपच्या कार्यकारणीत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी जशास तसे उत्तर दिले. 'देवेंद्र फडणवीस, उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी (cm uddhav thackery) आहेत तुम्ही नाही' असा सणसणीत टोला मलिक यांनी फडणवीसांना लगावला.
भाजपच्या कार्यकारणी बैठक मुंबईत पार पडली. यावेळी 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुणीच मुख्यमंत्री मानत नाही, काही मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजता असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नवाब मलिक यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.
देवेन्द्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरेजी यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे. देवेन्द्रजी, उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत तुम्ही नाही..
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
'देवेंद्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे. देवेन्द्रजी, उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत तुम्ही नाही' असं म्हणत मलिक यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली.
काय म्हणाले होते फडणवीस?
'महाराष्ट्राच्या विश्वासहार्तेवर प्रश्न निर्माण झाले आहे. एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि मंत्री आहे की जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ नाही. आपल्या काळात प्रकल्पांवर चर्चा होते. आज चर्चा कशावर होते तर गांजा, हर्बल तंबाखूवर होते. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून यांची नोंद होईल, अशी टीका फडणवीस यांनी केली.
'सरकार येणार की नाही हे मनातून काढून टाका, येईल तर बोनसच. काही चिंता करू नका. पण जनतेसाठी लढा देण्यासाठी आपल्याला उतरायचं आहे. सरकार येईल तेव्हा येईल. जनतेसाठी आपली अंतिम लढाई आहे. लोकशाहीने ज्या आंदोलनाचा अधिकार दिला ते आपलं शस्त्र आहे. मोदींनी जनतेवर प्रेम आहे तिच आपली शिदोरी आहे. प्रथम स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत आपल्याला विजय मिळवायचा आहे. जेव्हा 2024 च्या निवडणुका होती तेव्हा पूर्ण बहुमताने आपलं सरकार आणायचं आहे, असं फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.