दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात अज्ञातांची तुफान दगडफेक, महिला प्रवासी जखमी

दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात अज्ञातांची तुफान दगडफेक, महिला प्रवासी जखमी

कांचनच्या चेहऱ्यावर दगड जोरात आपटल्याने तिचा ओठ फाटला असून दोन दात तुटले आहेत. तिच्यावर रात्रीच तातडीची शस्त्रक्रियाही करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

  • Share this:

प्रदीप भणगे, प्रतिनिधी

मुंबई, 05 ऑक्टोबर : ठाणे रेल्वे स्थानकावरुन निघालेल्या लोकलवर दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या परिसरात अज्ञातांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत महिला प्रवाशी जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दगडफेकीमुळे प्रवाश्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली.

कांचन हाटले असं लोकलवरील दगडफेकीत जखमी झालेल्या तरुणीचं नाव असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दिवा पश्चिमेला राहणारी कांचन मुलुंडच्या एका खासगी कंपनीत काम करते. काल रात्री ऑफिसमधून निघाल्यावर ठाण्याहून नऊ वाजताची डोंबिवली स्लो लोकल तिने पकडली.

ही लोकल सव्वा नऊच्या सुमारास मुंब्रा खाडी पुलाजवळ येताच अचानक मागच्या लेडीज फर्स्ट क्लास डब्यावर दगड भिरकवण्यात आले. या घटनेत कांचन आणि अन्य एक तरुणी जखमी झाली. या प्रकारामुळे लोकलमध्ये एकच खळबळ माजली. यानंतर कांचनला आधी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणि तिथून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कांचनच्या चेहऱ्यावर दगड जोरात आपटल्याने तिचा ओठ फाटला असून दोन दात तुटले आहेत. तिच्यावर रात्रीच तातडीची शस्त्रक्रियाही करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर लोकलवर दगडं मारणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी कांचनच्या आईने केली आहे.

ज्या ठिकाणी दगडफेकीचा प्रकार घडला आहे, तिथे यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. मात्र, यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार प्रवाश्यांनी बोलून दाखवली. या घटनेची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

VIDEO 'करिष्मानं माझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं होतं'

First published: October 5, 2018, 9:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading