मुंबई, 23 नोव्हेंबर : कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना कोरोना लशीच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांचा मात्र मोठा फायदा होत आहे. देशांतर्गत शेअर बाजार यामुळे नव्या विक्रमाच्या पातळीवर पोहोचला. BSEचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 44,271.15 च्या विक्रमी पातळीवर पोहोचली. तर, NSE चा 50 शेअर्स असलेला इंडेक्स निफ्टी 100 अंकांनी वधारला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शेअर बाजाराच्या या तेजीत गुंतवणूकदारांनी काही मिनिटांत 1.12 लाख कोटी रुपयांची कमाई केली.
यादरम्यान, देशात आणि जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे मार्कट तज्ज्ञांनी शेअर विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी बँक निफ्टीने 655 अंकांची रिकव्हरी केली होती. बाजाराची सर्वात जास्त रिकव्हरी शॉर्ट कव्हरिंगमुळे झाली, ज्यामुळे इंडेक्स एक टक्क्यांपर्यंत वाढला. निफ्टी फ्यूचर्स नंतर ओपन इंटरेस्ट 13. 5 टक्क्यांनी घटला.
वाचा-10 हजारांच्या गुंतवणुकीतून मिळणार 16 लाखांचा फायदा, काय आहे ही स्किम जाणून घ्या
Sensex opens in the green - currently at 44,225.53, up by 343.28 points. Nifty at 12,958.05, up by 99.00 points. pic.twitter.com/l3uOJl3EEM
— ANI (@ANI) November 23, 2020
वाचा-1 डिसेंबरपासून बदलणार 'हे' 4 नियम! आताच जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान
आता गुंतवणूकदारांनी काय करावे?
जगातील सर्वात मोठे ब्रोकरेज हाऊस CLSA ने भारती इंफ्राटेलवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरचे लक्ष्य 265 रुपयांवरून 280 रुपये केले आहे. ते म्हणतात की कंपनीचा ग्रोथ आउटलुकमध्ये सुधारताना दिसत आहे. CLSAने IT क्षेत्रातील कंपनीवर मत व्यक्त केले की, या क्षेत्रातील ग्रोथ आउटलुक मजबूत आहे आणि मार्जिनमध्ये कोणतीही अडचण नाही. यासह आयटी कंपन्यांच्या पाइपलाइन मजबूत आहेत. ते HCL Tech, Infosys आणि Tech Mahमध्ये वाढ झाली आहे.
वाचा-केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंची कमाई, हे आहेत सर्वात बेस्ट पर्याय
काय झाली शेअर बाजारात उसळी
तज्ज्ञांनी सांगितले की जागतिक बाजारपेठेला वेग आला आहे. अमेरिकेचा अग्रणी बेंचमार्क इंडेक्स डाऊ फ्यूचर्स 80 अंकांनी वधारला. त्याच वेळी दक्षिण कोरियन इंडेक्स केओएसपीआय आशियाई बाजारात वेगाने व्यापार करीत आहे. जपानच्या बेंचमार्क इंडेक्स निक्की मधील व्यापार आज बंद आहे.