Home /News /mumbai /

मातोश्रीचा ढाण्या वाघही निसटला...; थेट गुवाहाटीपर्यंत घेतली उडी

मातोश्रीचा ढाण्या वाघही निसटला...; थेट गुवाहाटीपर्यंत घेतली उडी

आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं.

    नवी दिल्ली, 22 जून : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काल झालेल्या भूकंपाचे आजही धक्क्यावर धक्के मिळत आहे. गुवाहाटीला रवाना झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) व्हिडीओ समोर आला आणि अनेकांना धक्काच बसला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदार त्यांच्यासोबत असल्याचं सांगत होते. त्याशिवाय बहुमतात असल्याने आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं जाहीर केलं होतं. परिणामी उद्धव ठाकरेंकडे असलेले आमदारातील काही आमदार तरी फुटतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. आणि ती शक्यता खरी ठरली. आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी आणखी 10 आमदार आमच्यासोबत येतील अशी शक्यता व्यक्त केली होती. दुपारपर्यंत त्यांच्याजवळ 46 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याशिवाय शिवसेनेचे दोन आणि तीन अपक्ष असे पाच आमदार सायंकाळपर्यंत गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता आहे. यासर्वात शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कारण मातोश्रीचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील गुवाहाटीला निघाल्याचे समोर आले आहे. ठाकरे सरकारमधील सध्याचे आक्रमक शिवसैनिक म्हणून गुलाबराव पाटील यांना ओळखलं जातं. गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पानटपरीवाला ते आमदार अशी गुलाबराव पाटील यांनी मोठी उडी घेतली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपाशी युती करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील भाजपासोबत जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आहे. राष्ट्रवादी नेते याबाबत अध्यक्ष शरद पवारांकडे (Sharad Pawar) मत मांडणार आहेत. अजित पवार यांच्या दालनात एनसीपी नेत्यांची बैठक सुरू आहे. राज्य मंत्रीमंडळची बैठक संपताच दुसरी बैठक झाली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assam, Eknath Shinde, Gulabrao patil, Shivsena

    पुढील बातम्या