S M L

मुंबईला जास्तीजास्त सुविधा देणे राज्य सरकारचं काम नाही का?-सामनातून भाजपवर टीका

पालिकेवर ठपका ठेवण्याची आता एक फॅशनच आलीय अशी टीकाही या अग्रलेखात केलीय

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 31, 2017 04:12 PM IST

मुंबईला जास्तीजास्त सुविधा देणे राज्य सरकारचं काम नाही का?-सामनातून भाजपवर टीका

मुंबई,31 ऑगस्ट: मंगळवारी मुंबईत झालेल्या पावसानंतर मुंबईचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासाठी मुंबई महानगरपालिकावर सगळीकडूनच टीका होते आहे. तरी  शिवसेना-भाजपमध्ये मुंबईच्या पालकत्वावरून वाद चालूच आहे. आज सामनातून मुंबईला जास्तीजास्त सुविधा कोण देणार असा प्रश्नच सामनातून विचारला गेला आहे.

सामन्यातील अग्रलेखात, 'मुंबईत मुसळधार पाऊस झाला व मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाची दैना उडाली असं चित्र निर्माण केले जात आहे. सव्वीस जुलैनंतरचा सर्वाधिक पाऊस पडला व तो फक्त मुंबईतच पडला असं नाही, ज्या महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता नाही तेथेही तो पडला आहे' असं सांगणयात आलंय. पालिकेवर ठपका ठेवण्याची आता एक फॅशनच आलीय अशी टीकाही या अग्रलेखात केलीय. 'तुम्ही फक्त मुंबईची आर्थिक लुटच करणार आहात' असा सवालही सामनातून विचारला गेला आहे. 'एमएमआरडीएने जे रस्ते खणून ठेवले आहेत व जागोजागी जे ढिगारे केले त्याचे खापर तुम्ही शिवसेना किंवा महापालिकेवर फोडताय हा अन्याय आहे' असंही सामन्यातून म्हटलं गेलंय. तर मुंबईची नालेसफाई चोख झाल्यामुळेच चोवीस तासांत पाण्याचा निचरा झाला असं या अग्रलेखात सांगण्यात आलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 09:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close