शिवशाहीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता; दर 505 रुपयांनी झाले कमी

शिवशाहीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता; दर 505 रुपयांनी झाले कमी

एसटी महामंडळाने शिवशाही बस सेवेचे तिकीट दर 230 ते 505 रुपयांनी कमी केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 फेब्रुवारी: एसटी महामंडळाने शिवशाही बस सेवेचे तिकीट दर 230 ते 505 रुपयांनी कमी केले आहेत. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 13 फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत.

राज्यातील 42 मार्गावर शिवशाही बस (स्लीपर) धावते. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी शिवशाहीच्या दरकपातीचा विचार सुरु होता. तसा प्रस्ताव देखील प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थीती आणि खासगी वाहतुकीशी स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर आणि माफक दरात व्हावा या उद्देशाने ही कपात करण्यात आल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडलाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.

राज्यात ज्येष्ठ नागरिकांना याआधीच प्रवासात 30 टक्के सवलत आहे. आता नव्या दरामुळे त्यांना शिवशाहीचा प्रवास आणखी स्वस्त होणार आहे.

असे आहेत नवे दर (कंसातील दर जुने)

*मुंबई-औरंगाबाद: 810 (1085)

*मुंबई-लातूर: 950 (1275 )

*मुंबई-रत्नागिरी: 715 (955)

*मुंबई-कोल्हापूर: 785 (1050)

*मुंबई-अक्कलकोट: 905 (1210)

*मुंबई-पंढरपूर: 760 (1020)

*बोरिवली-उदगीर: 1105 (1480)

*पुणे-नागपूर: 1485 (1990)

VIDEO : सरकार विरोधात बोलणाऱ्या अमोल पालेकरांचे भाषण अर्ध्यातच थांबवलं

First published: February 10, 2019, 11:37 AM IST

ताज्या बातम्या